गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण
भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतर सर्वाधिक प्रमाणात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे अर्थात सर्व्हायकल (cervical) कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी भारतात सुमारे १ लाख २५ हजार महिलांना या कर्करोगाचे निदान होते व त्यातील ७५ हजार जणींचा मृत्यू होतो. यातील बहुतांश, म्हणजे ९५ टक्के महिलांना ह्यूमन पापिलोमाव्हायरसमुळे (HPV- Human Papillomavirus) हा कर्करोग होतो. गर्भाशय मुखातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोगाचा धोका उद्भवत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
असुरक्षित लैंगिक संबंध, एका पेक्षा अधिक लैंगिक भागीदार, लैंगिक संक्रमणातून होणारे आजार, धूम्रपान ही सर्व्हायकल कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत. नियमित तपासणी, अचूक निदान आणि लसीकरण हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्याचे तीन प्रभावी मार्ग आहेत. या कर्करोगापासून बचाव करण्याबाबत जागरूकता खूपच कमी आहे. चिंताजनक बाब म्हणजे सर्वसाधारण १० टक्क्यांपेक्षा कमी महिला या तपासणी करतात. या कर्करोगाची कोणतीही लक्षणे नसतानाही महिलांनी पॅप स्मीअर [ PAP Smear] तपासणी करणे आवश्यक असते. (फोटो सौजन्य – iStock)
लसीकरणाला सुरूवात
लसीणकरणाने होईल कॅन्सर बरा
कॅन्सरची ही लस मुलींना देता येते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, 2030 पर्यंत एचपीव्हीचे 90 टक्के लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास 140 देशांनी आता एचपीव्हीचे लसीकरण सुरू केले आहे.
हेदेखील वाचा – सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये का होत आहे झपाट्याने वाढ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
काय सांगतात तज्ज्ञ
लसीकरण करण्याचे फायदे, कधी आणि कोणत्या वयात करावे
डॉ मृणाल परब, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, कॅन्सर तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या सांगण्यानुसार HPV (HPV- Human Papillomavirus) वॅक्सीन चे 3 डोस घेतल्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर (cervical cancer) पासून 100% कायमचे संरक्षण मिळते तसेच या वॅक्सीन मुळे पुरुषांमध्ये होणाऱ्या पेनाइल ( Penile cancer ) चे पण प्रमाण कमी होते हे वॅक्सीन 9 ते 45 वर्षापर्यंत सर्व मुलामुलींना आणि स्त्री पुरुषांनी घेणे योग्य राहील.
हेदेखील वाचा – तपासणी व उपचाराअंती ‘सर्व्हिकल कॅन्सर’ बरा होऊ शकतो
ही लस कधी घ्यावी
लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधी पौगंडावस्थेत मुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते. अगदी 35 ते 45 वर्षे वयोगटातील प्रौढ महिला देखील या लसीसाठी पात्र आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. डॉ मृणाल परब यांच्या मते लैंगिकदृष्ट्या सक्रिय झाल्यानंतरही या वॅक्सीन मुळे 60 ते 70% कॅन्सरचे प्रमाण कमी होते.
कधी करावी चाचणी
रुटीन पॅप स्मीअर किंवा एचपीव्ही चाचणी गर्भाशय मुखाच्या पेशींमध्ये बदल शोधण्यात मदत करू शकते. महिलांनी वयाच्या ३० वर्षांनंतर दर 3 ते 5 वर्षांनी ही तपासणी करत राहावी. त्याच वेळी, एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांनी वयाच्या 25 व्या वर्षापासून दर तीन वर्षांनी चाचणी घेणे सुरू केले पाहिजे.