सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसवर घरगुती उपाय
तासनतास ऑफिसमधील काम, घरातील कामे, सतत मोबाईल पाहत राहणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या पद्धतीने बसने, चुकीच्या पद्धतीने चालणे, पाठीला पोक काढून बसने इत्यादी सवयींमुळे पाठ किंवा मानेचे दुखणे उद्भवू शकते. पाठ किंवा मान दुखायला सुरुवात झाल्यानंतर अनेक उपाय केले जातात. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. तात्पुरते उपाय शरीराला थोडावेळ आराम देतात आणि त्यानंतर पुन्हा एका पाठ आणि मानेचे दुखणे सुरु होते. जीवनशैलीतील बदलांमुळे हल्ली सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हा आजार झाल्यानंतर मान आणि पाठीचे दुखणे मोठ्या प्रमाणावर वाढते. या आजारामुळे मानदुखी, ताठरपणा आणि चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात.(फोटो सौजन्य-istock)
धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्याला वेळ भेटत नाही. यामुळे अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. सतत लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करणाऱ्या लोकांमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हा आजार हा दिसून येतो. हा आजार झाल्यानंतर वेळीच लक्ष दिले नाहीतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस झाल्यानंतर मानेचे हाड, पाठीचा कणा मोठ्या प्रमाणावर दुखतो. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसला सोप्या भाषेत ग्रीवाचे ऑस्टियोआर्थराइटिस आणि मानेचा संधिवात असे म्हणतात.
सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसवर घरगुती उपाय
हे देखील वाचा: 50 नंतर महिलांनी खा हे विटामिन्स, हाडं राहतील मजबूत
सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसवर घरगुती उपाय
सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास जाणवू लागल्यानंतर मान आणि पाठीचा कणा गरम पाण्याने शेकवा. यामुळे मान आणि पाठीमधील वेदना कमी होऊन आराम मिळेल. यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून त्यात टॉवेल भिजवून तो मानेवर आणि पाठीवर ठेवा. गरम पाण्याचा शेक लागल्यानंतर हळूहळू मानेचे दुखणे कमी होईल. हा उपाय नियमित केल्यामुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसवर आराम मिळवता येईल.
सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसवर घरगुती उपाय
सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसवर आराम मिळवण्यासाठी नियमित योगासने आणि भुजंगासन, हलासन आणि मार्जरियासन आणि स्ट्रेचिंग करावे. यामुळे मान आणि पाठीच्या कण्याचे दुखणे थांबून आराम मिळेल. हे व्यायाम प्रकार नियमित केल्यामुळे सतत येणारी चक्कर थांबेल.
हे देखील वाचा: उठताना किंवा बसताना हाडांमधून आवाज येतो? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वेदना होतील कमी
सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसवर घरगुती उपाय
मानेचा कणा आणि पाठीमधील वेदना वाढू लागल्यानंतर तिळाच्या तेलाने मान आणि पाठीला मालिश करा. या तेलाने मालिश केल्यामुळे स्नायूंचा जडपणा दूर होऊन वेदनांपासून आराम मिळेल.