Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine Day 2026: प्रेमाची डिजीटल खूण तरूणाईची पसंती! काय आहे ‘कपल्स गर्ल रिंग’

सध्या ‘व्हॅलेंटाईन वीक’मुळे शहरात गिफ्ट खरेदीची जोरदार लगबग सुरू असून फुलांची दुकाने आणि गिफ्ट शॉप्स सजून निघाली आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 10, 2026 | 04:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन वीक’ची धूम पाहायला मिळत असून, ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणाईसह सर्व वयोगटांमध्ये गिफ्ट खरेदीची लगबग सुरू झाली आहे. हा आठवडा केवळ प्रेमी युगुलांसाठीच नव्हे, तर मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींना प्रेम व आपुलकी व्यक्त करण्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर शहरातील गिफ्ट दुकाने, फुलांची दुकाने आणि शो-रूम्स सजून निघाल्या आहेत.

White Discharge मुळे सतत पाठ- कंबर दुखत राहते? मग आहारात करा ‘या’ घरगुती पदार्थांचा समावेश, अशक्तपणा होईल कमी

व्हॅलेंटाईन वीकमुळे गुलाब, कार्नेशनसारख्या फुलांच्या दरात वाढ झाली असून, चॉकलेट्स, सॉफ्ट टॉयज आणि खास गिफ्ट वस्तूंनाही मोठी मागणी आहे. मात्र यंदा पारंपरिक गिफ्ट्सपेक्षा हटके आणि वेगळ्या संकल्पनांवर आधारित गिफ्ट्सकडे तरुणाईचा कल वाढलेला दिसून येत आहे. त्यातच ‘आय लव्ह यू’ हे तब्बल १०० भाषांमध्ये लिहिलेली ‘कपल्स गर्ल रिंग’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही अंगठी डिजिटल पद्धतीने प्रेम व्यक्त करणारी असल्याने तरुणाईमध्ये ती विशेष लोकप्रिय होत आहे. पारंपरिक फुले किंवा चॉकलेट्सपेक्षा वेगळं काहीतरी द्यायचं असेल, तर ‘कपल्स गर्ल रिंग’ हा एक आकर्षक पर्याय ठरत आहे. विशेष म्हणजे ही अंगठी बजेट फ्रेंडली असून, अवघ्या १४९ रुपयांपासून उपलब्ध आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, तरुण-तरुणी तसेच महिलांमध्येही या अंगठीला मोठी मागणी आहे.

ही रिंग प्लास्टिक गोल्ड रोझ आणि ‘रोज गॉली’ या मटेरियलमध्ये उपलब्ध असून, त्यामध्ये लहान लेन्सद्वारे १०० वेगवेगळ्या भाषांमध्ये ‘आय लव्ह यू’ असा संदेश दिसतो. एका साध्या अंगठीतून इतक्या भाषांमध्ये प्रेम व्यक्त करता येत असल्याने ही कल्पना तरुणाईला भावली आहे. स्थानिक विक्रेते शुभम जोशी (सुपारी हनुमान परिसर) यांनी सांगितले की, “यंदा व्हॅलेंटाईन वीकमध्ये कपल्स गर्ल रिंगला चांगलीच मागणी आहे. वाजवी किंमत आणि वेगळेपणामुळे तरुणाई ही रिंग मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे.”

Recipe : चहाची मजा करा द्विगुणित, विकतंच कशाला? घरीच बनवा कुरकुरीत अगदी बाजारासारखी खमंग ‘मठरी’

फेब्रुवारी महिना सुरू झाला की व्हॅलेंटाईन डेचे वेध लागतात आणि त्यानिमित्त गिफ्ट देण्या-घेण्याची धावपळ सुरू होते. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आवडीनुसार आणि बजेटनुसार गिफ्ट खरेदी करून प्रेम व्यक्त करण्याचा हा खास आठवडा मानला जातो. १४ फेब्रुवारीपर्यंत बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून, दुकानदारांनीही या काळासाठी खास तयारी केली आहे. व्हॅलेंटाईन वीकमुळे केवळ प्रेम व्यक्त करण्याचीच नाही, तर स्थानिक बाजारपेठेतील व्यवहारांनाही चालना मिळत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

Web Title: Valentines day 2026 digital token of love preferred by youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Valentine Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.