Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या व्रतासाठी आधीच बनवून ठेवा कुरकुरीत उपवासाचा चिवडा; सर्वच खातील आवडीने

वटपौर्णिमा पूजा विशेष: वटपौणिमेचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवासाला या दिवशी फार महत्त्व, उपवासावेळी जर तुम्हाला हलकी भूक लागत असेल तर तुम्ही उपवासाचा चिवडा बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2025 | 10:13 AM
Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या व्रतासाठी बनवून ठेवा कुरकुरीत उपवासाचा चिवडा; सर्वच खातील आवडीने

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या व्रतासाठी बनवून ठेवा कुरकुरीत उपवासाचा चिवडा; सर्वच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, आणि त्यात स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. धार्मिक कथेनुसार, देवी सतीने वडाच्या झाडाखाली पूजा करून आपल्या पतीचे प्राण वाचवले होते ज्यांनंतर वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली.

१० मिनिटांमध्ये सकाळच्या डब्यासाठी बनवा चमचमीत कांदा शिमला मिरचीची भाजी, चपतीसोबतच लागेल चवदार

प्रत्येक वर्षी विवाहित स्त्रिया एकत्र जमतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत हाच नवरा सात जन्म मिळू देत अशी देवचारणी प्रार्थना करतात. या दिवशी उपवासाला विशेष महत्त्व! वटपौर्णिमेच्या उपवासावेळीअनेक पदार्थ खाणे वर्ज्य असते अशात अनेकदा हलकी भूक लागली की मग काय खावे असा प्रश्न निर्माण होतो. उपवासाचं खाल्ल्यानंतरही जर तुम्हाला भूक लागत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही आधीच उपवासाचा चिवडा तयार करून ठेवू शकता. साबूदाणा, शेंगदाणे, राजगिरा, आलं आणि मिरच्यांचा स्वाद मिसळून तयार होणारा हा चिवडा स्वादिष्ट आणि पचायला हलका असतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • १ कप साबूदाणा (मोठा/मध्यम)
  • १/२ कप शेंगदाणे
  • १/४ कप राजगिरा लाह्या
  • १/४ कप सुकं खोबरं (चिरलेलं)
  • २ टेबलस्पून साजूक तूप किंवा शेंगदाण्याचं तेल
  • ५–६ कढीपत्ता (पर्यायी)
  • २ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या किंवा फोडी)
  • १ टीस्पून जिरे
  • सैंधव मिठ – चवीनुसार
  • साखर – अर्धा टीस्पून (पर्यायी)
  • लिंबाचा रस – १ टीस्पून (पर्यायी)
Vat Purnima 2025: वटपौर्णिमेचे व्रत करताय? मग यंदा उपवासाला बनवून पहा उपवासाचे अप्पे

कृती

  • उपवासाचा चिवडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईत मध्यम आचेवर साबूदाणा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या, याने ते थोडे हलके फुललेले दिसतील.
  • आता त्याच कढईत थोडं तेल/तूप घालून शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. नंतर थोडं थंड झाल्यावर सोलून घ्या
  • राजगिरा लाह्या कोरड्या पद्धतीने १-२ मिनिटं परतून बाजूला ठेवा
  • कढईत २ टेबलस्पून तूप गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता आणि चिरलेल्या मिरच्या घालून फोडणी द्या
  • फोडणीत चिरलेलं सुकं खोबरं घालून थोडं खरपूस होईपर्यंत परतून घ्या
  • भाजलेला साबूदाणा, शेंगदाणे, राजगिरा लाह्या सगळं एकत्र करून फोडणीत मिसळा
  • यांनतर यात सैंधव मीठ आणि थोडीशी साखर घालून चांगलं हलवत राहा
  • तयार चिवडा थोडा थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि उपवासाच्या दिवशी याची मजा लुटा
  • हे उपवासासाठी योग्य असल्यामुळे हिंग, हळद आणि लाल तिखट टाळा
  • लिंबाचा रस शेवटी टाकल्यास ताजेपणा येतो
  • हा उपवासाचा कुरकुरीत चिवडा तुम्हाला उपवासात चवदार, हलकं आणि झटपट खाण्याचा आनंद देतो

Web Title: Vat purnima 2025 make tasty and crunchy upvas chivda at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • marathi recipe
  • upvas food
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
2

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
3

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Vat Purnima Special: वटपौर्णिमा स्पेशलमध्ये रहस्य, रोमान्स आणि ड्रामा; ‘मी जिंकून घेईन सारं’-‘मोहिनी’चा महासंगम
4

Vat Purnima Special: वटपौर्णिमा स्पेशलमध्ये रहस्य, रोमान्स आणि ड्रामा; ‘मी जिंकून घेईन सारं’-‘मोहिनी’चा महासंगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.