१० मिनिटांमध्ये सकाळच्या डब्यासाठी बनवा चमचमीत कांदा शिमला मिरचीची भाजी
रोज सकाळी उठल्यानंतर ऑफिसच्या डब्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पद्धतीमधील भाजी खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही कांदा शिमला मिरची बनवू शकता. लहान मुलं बऱ्याचदा भाजीमधील कांदा किंवा शिमला मिरची काढून टाकतात. पण असे न करता सर्वच भाज्यांचे नियमित सेवन करावे. कांद्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह केसांना अनेक फायदे होतात. केसांच्या वाढीसाठी कांदा अतिशय प्रभावी आहे. कोणतीही भाजी बनवल्यानंतर मुलं कांदा बाजूला काढून टाकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चटपटीत कांदा शिमला मिरचीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा High protein egg sandwich, नोट करून घ्या सोपी रेसिपी
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक गाजर सूप, नोट करून घ्या रेसिपी