विटामिन बी१२ साठी शाकाहारी पदार्थ
विटामिन बी 12 हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे, जे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीदेखील आवश्यक आहे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मज्जासंस्था आणि मेंदूचे कार्य बिघडते हे आपण अनेकदा अभ्यासातून शिकलो आहोत. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा, थकवा येणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि नैराश्य यासारखी लक्षणे दिसू शकतात. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा धोका जास्त असतो, कारण हे जीवनसत्व प्रामुख्याने प्राण्यांच्या उत्पादनांमध्ये आढळते. मात्र, या जीवनसत्त्वाची कमतरता तुम्ही शाकाहारी आहारातूनही पूर्ण करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच 4 शाकाहारी पदार्थांबद्दल सांगत आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही व्हिटॅमिन बी12 ची कमतरता टाळू शकता आणि तुमचे शरीर आणि मन निरोगी ठेवू शकता. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही शाकाहारी पदार्थांची माहिती दिली आहे ती जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
दूध आणि दुधासह बनलेले पदार्थ
डेअरी उत्पादनांचा करा वापर
दूध आणि दही, चीज आणि ताक यासारखे विविध पदार्थ हे व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्रोत आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे नियमित सेवन केल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची कमतरता पूर्ण करू शकता. दररोज सकाळी किंवा रात्री एक ग्लास दूध प्यावे. याशिवाय तुमच्या नियमित आहारात चीज आणि दही यांचा समावेश करा.
हेदेखील वाचा – Vitamin B12 ची कमतरता जाणवतेय, आहारात समाविष्ट करा 5 पदार्थ
फोर्टिफाईड धान्य-तृणधान्य
तृणधान्यांचा करा आहारात समावेश
फोर्टिफाइड तृणधान्ये म्हणजे ज्यामध्ये अतिरिक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे जोडली जातात. अशा धान्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील समाविष्ट आहे. बाजारात उपलब्ध असलेली अनेक फोर्टिफाइड तृणधान्ये व्हिटॅमिन बी 12 ने समृद्ध आहेत आणि शाकाहारींसाठी एक चांगला पर्याय आहेत. न्याहारीसाठी तुम्ही तृणधान्ये खा आणि याचा अधिक समावेश करून घ्या.
सोयापासून तयार झालेली उत्पादने
सोयापासून तयार कऱण्यात आलेले पदार्थ
सोया, सोयाचे दूध आणि टोफू हे व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्त्रोत आहेत. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी सोया उत्पादने हा एक उत्तम पर्याय आहे. शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची कमतरता सोया उत्पादनांच्या सेवनाने भरून काढता येते. टोफूची भाजी, सलाड करून किंवा सूपमध्ये मिसळून खा. सोया चंक्सदेखील तुम्ही खाऊ शकता.
न्यूट्रिशनल यीस्ट
न्यूट्रिशनल यीस्टचा करा उपयोग
पौष्टिक यीस्ट हे एक पूरक अन्न आहे जे शाकाहारी लोक व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी वापरू शकतात. त्याची चव चीजसारखी असते. तुम्ही न्यूट्रिशनल यीस्टचा वापर सलाड, पास्ता किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळून खाण्यासाठी करू शकता. आपण सलाड किंवा पास्तामध्ये पौष्टिक यीस्ट घालून खाण्याने योग्य विटामिन बी१२ प्राप्त होऊ शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.