विटामिन बी१२ साठी शाकाहारी पदार्थ
विटामिन बी12 ची कमतरता हा सध्याचा वाढता त्रास आहे. खरं तर शरीर स्वतः विटामिन बी 12 तयार करत नाही त्यासाठी अन्नावर अवलंबून राहावे लागते. हे स्नायूंच्या वाढीस, हाडे मजबूत करण्यास, मेंदूचे कार्य सुधारण्यास आणि रक्त निर्माण करण्यास मदत करते. जरी विटामिन बी 12 मांस, मासे आणि अंडी यांसारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये आढळत असले तरी, काही शाकाहारी पदार्थांमधूनही तुम्हाला विटामिन बी१२ मिळू शकते.
आता हे पदार्थ नक्की कोणते आहेत आणि त्याचा कसा फायदा मिळतो यासाठी तुम्हाला हा लेख वाचावा लागेल. विटामिन बी१२ ची शरीराला आवश्यकता असते अन्यथा शरीरावर चुकीचे परिणाम होतात आणि अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. PharmEasy च्या डॉ. निकिता तोशी यांनी सांगितल्याप्रमाणे विटामिन बी१२ ची कमतरता भरून काढण्यासाठी जाणून घ्या कोणते आहेत पदार्थ (फोटो सौजन्य – iStock)
दूध आहे उत्तम सोर्स
दुधाने वाढवा विटामिन बी१२
जर तुम्ही मांस खात नसाल, तर तुम्हाला दुधापासून व्हिटॅमिन बी12 चांगल्या प्रमाणात मिळू शकते. NIH च्या अहवालानुसार, एका कप दुधापासून तुम्हाला 1.3 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी12 मिळू शकते. याशिवाय हाडांना चांगली मजबूती देण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे दिवसातून 1 गाल्स दूध नक्की प्यावे
सेरियल्सचा करा वापर
नाश्त्यात पुरी भाजी किंवा पराठाऐवजी कडधान्ये खायला सुरुवात करा. कडधान्यं किंवा ब्रेकफास्ट सेरियल सर्व्हिंगमधून तुम्हाला 0.6 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी 12 मिळू शकते. यामध्ये अधिक फायबर असल्यामुळे तुम्हाला लवकर भूकही लागत नाही आणि याचाही चवही चांगली असते. त्यामुळे याचा नाश्त्यात वापर करावा.
दही ठरेल वरदान
दह्याचा करा वापर
दुधापासून बनवलेले दहीदेखील विटामिन बी 12 चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि आपण ते आपल्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. एक कप दह्यापासून तुम्हाला 1 मायक्रोग्रॅम विटामिन बी12 मिळू शकते. आपल्या दुपारच्या जेवणामध्ये दह्याचा समावेश करून घ्या. दही भात, कोशिंबीरमध्ये दह्याचा वापर करावा.
मशरूमचा करा समावेश
मशरूमची भाजी ठरेल वरदान
मशरूम्स अनेकांना खायला आवडतात. ही भाजी तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करून घ्यावी. विटामिन बी12 चा चांगला स्रोत असून 50 ग्रॅम मशरूम तुम्हाला चांगले विटामिन मिळवून देते. मशरूम सलाड, भाजी यासारख्या पदार्थांतून तुम्ही आहारात समावेश करून घेऊ शकता.
टेम्पेह
टेम्पेह मूळ रूपात सोयाबीनचा उपयोग करून तयार केले जाते, जे विटामिन बी12 आणि प्रोटिन्सने अधिक युक्त आहे आणि त्याचा शरीराला चांगला फायदा मिळतो. अर्धा कप टेम्पेहमध्ये 0.1 मायक्रोग्राम विटामिन बी12 आढळते. त्यामुळे तुम्ही याचाही आहारामध्ये उपयोग करून घेऊ शकता.