विटामिन बी१२ (फोटो सौजन्य - iStock)
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार आवश्यक आहे. मात्र सध्या आपण काहीही आणि कोणत्याही वेळी खातो. ज्याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास अनेक समस्या निर्माण होतात.
या पोषकतत्त्वांमध्ये विटामिन बी12 देखील समाविष्ट आहे. विटामिन बी 12 हे रक्त तयार करण्यापासून ते संवेदनशील न्यूरोलॉजिकल कम्युनिकेशन पार पाडण्यापर्यंत आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे पोषक घटकांपैकी एक आहे. म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया या विटामिनचा पुरवठा करण्यासाठी तुम्ही कोणत्या 5 गोष्टींचा आहारात समावेश करावा. (फोटो सौजन्य – iStock)
डेअरी उत्पादने
दुग्धजन्य पदार्थ (फोटो सौजन्य – iStock0
दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ शरीरातील विटामिन बी12 पातळी वाढवण्यास मदत करतात. त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, विटामिन ए, विटामिन डी, झिंक, पोटॅशियम आणि कोलीन इत्यादी आढळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तुम्ही नियमित या सर्व पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला नैसर्गिकरित्या विटामिन बी१२ अधिक प्रमाणात मिळेल.
अंड्याचा समावेश
अंडी उत्तम स्रोत (फोटो सौजन्य – iStock)
नाश्त्यात अंड्यांचा समावेश केल्याने तुम्हाला भरपूर प्रथिने मिळतात. सकाळी अंडे खाणे तुमच्यासाठी उत्तम असू शकते. याशिवाय अंडी हे विटामिन बी12 चा खूप चांगला स्रोत आहे. जर तुम्ही नियमितपणे २ अंडी खाल्ली तर ते तुमच्या शरीरातील विटामिन बी 12 च्या रोजच्या गरजेच्या 46 टक्के भाग पूर्ण करते. त्यामुळे याची कमतरता भासत नाही.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांचा समावेश (फोटो सौजन्य – iStock)
विटामिन बी 12 समृद्ध पदार्थांमध्ये हिरव्या पालेभाज्या आणि अनेक फळेदेखील समाविष्ट आहेत. केल, पालक आणि राजगिरा यांसारख्या भाज्यांचे सेवन करून तुम्हाला विटामिन बी12 मिळू शकते. तसेच हंगामी फळांचे सेवन करा. यामध्ये वेगवेगळ्या फळांचा तुम्हाला समावेश करून घेता येतो.
सॅल्मन फिश
साल्मन मासे (फोटो सौजन्य – iStock)
सॅल्मन फिश हे मांसाहारातील विटामिन बी 12 चा सर्वोत्तम स्त्रोत आहे. विटामिन बी 12 व्यतिरिक्त, शरीराला ओमेगा -3 फॅटी ऍसिडसारखे पोषक घटकदेखील मिळतात. कोणत्याही पद्धतीने शिजवून ते तुमच्या आहारात समाविष्ट करता येईल. तुमच्या दिवसाच्या किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही हे समाविष्ट करू शकता.
भाज्या आणि फळे
भाज्याफळांचा समावेश (फोटो सौजन्य – iStock)
भाज्या आणि फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. विटामिन बी12 पुरवण्यासाठी पालक, बीटरूट, बटाटा, मशरूम इत्यादींचा आहारात समावेश करू शकतो. तुमच्या चवीनुसार तुम्ही निवडावे. कधी कधी नावडत्या भाज्या खाणेदेखील शरीराला चांगला फायदा मिळवून देऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून किमान १ वेळा तरी याचा आहारात समावेश करून घ्या.
संदर्भ
https://ods.od.nih.gov/factsheets/vitaminb12-healthprofessional/
https://www.health.harvard.edu/staying-healthy/the-a-list-of-b12-foods
https://pharmeasy.in/blog/9-vegetarian-foods-high-in-vitamin-b12/