Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रिजशिवाय देखील पाणी राहील खूप वेळ थंड! स्वयंपाकघरातील माठासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रीक्स

उन्हाळ्यात जेव्हा थंड पाणी प्यावं वाटतं तेव्हा स्वयंपाकघरातील माठ हा सर्वोत्तम कामी येतो. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहतेच, पण ते उन्हाळ्यात जास्त काळ थंड रहावं काही सोप्या ट्रीक्स देखील आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2026 | 05:07 PM
फ्रिजशिवाय देखील पाणी राहील खूप वेळ थंड! स्वयंपाकघरातील माठासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रीक्स
Follow Us
Close
Follow Us:
  • फ्रिजशिवाय देखील पाणी राहील खूप वेळ थंड!
  • स्वयंपाकघरातील माठासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रीक्स
उन्हाळ्याच्या कडाक्यात थंड पाणी पिण्याची इच्छा सगळ्यांनाच होते पण फ्रिजचं पाणी पिणं प्रत्येकाच्या शरीराला सुट होत नाही. त्यामुळे याला पर्याय म्हणून काही जण नैसर्गिक पद्धतीने थंड पाणी म्हणजेच माठातलं पाणी पिणं पसंत करतात. उन्हाळ्यात जेव्हा थंड पाणी प्यावं वाटतं तेव्हा स्वयंपाकघरातील माठ हा सर्वोत्तम कामी येतो. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहतेच, पण ते उन्हाळ्यात जास्त काळ थंड रहावं काही सोप्या ट्रीक्स देखील आहेत.

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

तुमच्याही घरी जर माठ असेल तर हा प्रयोग नक्की करुन पाहा. या ट्रीक्स छोट्या असल्या तरी याचा परिणाम मोठा आहे.

1. माठ ओलसर ठेवा
माठाच्या बाहेरील भागावर वेळोवेळी पाणी शिंपडा. मातीमधून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे (evaporation) पाणी अधिक थंड राहते. ही ट्रीक फार जुनी आहे. पुर्वीच्या गावातली माणसं कडाक्याच्या उन्हात पाणी थंड रहावं म्हणून माठाचा ओलसर कपडा गुंडाळून ठेवायचे.

2. थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा
माठ नेहमी सूर्यप्रकाशापासून दूर आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. खिडकीजवळ किंवा सावलीत ठेवलेला माठ अधिक वेळ थंड राहतो. त्यामुळे पाणी गार जास्तवेळ राहतं.

3. माठ स्टँडवर ठेवा
माठ थेट जमिनीवर ठेवण्याऐवजी लाकडी किंवा प्लास्टिकच्या स्टँडवर ठेवा. यामुळे हवा खेळती राहते आणि थंडावा टिकतो. काहीवेळा जमिन किंवा लादी जास्त तापते म्हणूनच माठ कोणत्या ना कोणत्या स्टँडवर ठेवा.

4. नियमित स्वच्छता करा
माठ स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा तरी माठ धुवून वाळवावा. त्यामुळे पाणी ताजे आणि शुद्ध राहते. आरोग्यासाठी पाणी थंड असण्याबरोबरच ते शुद्ध असणं देखील महत्वाचं आहे.

5. नवीन माठ वापरण्यापूर्वी भिजवा
नवीन माठ घेतल्यावर तो काही तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे मातीची छिद्रे सक्रिय होतात आणि थंडावा वाढतो.माठातील पाणी केवळ थंडच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असते. त्यामुळे या साध्या आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करून तुम्ही फ्रिजशिवायही दिवसभर गार पाण्याचा आनंद घेऊ शकता. अशा छोट्या छोट्या सोप्या पण परिणामकारक ट्रीक्समुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या पाणी गार मिळेल.

Summer special fabric: फक्त सनस्क्रीन पुरेसे नाही; गरमीपासून त्वचेला वाचायचंय? मग ‘अशा’ कपड्यांची निवड करा

Web Title: Water will stay cold for a long time even without a fridge use these simple tricks for kitchen earthen water tank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 05:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.