
स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणे
स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. या आजारात मानवाची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलून जाते. शरीरात मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. हा आजार झालेल्या व्यक्तीमध्ये अनेक बदल दिसून येतात. त्या व्यक्तीचे विचार, समज आणि वागण्या बोलण्यात अनेक बदल होतात. स्किझोफ्रेनिया झालेले रुग्ण कोणत्याही कारणाशिवाय एखादया व्यक्तीवर संशय घेऊ लागतात आणि स्वतःच्या जगात पूर्णपणे हरवून जातात. शिवाय कोणीतरी आपल्या विरुद्ध कट रचत आहे, अशी भावना त्यांच्या मनात सतत निर्माण होत राहते. त्या व्यक्तीला इतरांनी दिलेले सल्ले नेहमीच खोटे वाटू लागतात. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना कितीही समजवले तरीसुद्धा ते कोणच ऐकत नाहीत.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
गंभीर मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचा आजार जसजसा वाढत जातो तसतसे त्या रुग्णाच्या मानसिकतेमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. आपल्यावर कोणी जादू केली आहे का असा भास रुग्णांना होऊ लागतो. स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची मानसिक स्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होते. हा आजार औषध आणि थेरेपी देऊन बरा केला जाऊ शकतो. मानसिक आजार झाल्यानंतर प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. या आजाराची ओळख पटल्यानंतर आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. आज आम्ही तुम्हाला स्किझोफ्रेनिया झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात? यावर नेमका काय उपचार केला जातो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मानसिक आजार झालेल्या रुग्णाची स्थिती पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य नेहमी संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करावा. स्किझोफ्रेनिया या आजारावर उपचार केल्यानंतर सुद्धा हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. औषधे आणि वर्तणूक थेरपीद्वारे नियंत्रित मिळवता येते. तसेच औषधांचे सेवन करून ताण तणावापासून दूर राहिल्यास हा आजार बरा होऊ शकतो. शिवाय योग, ध्यान आणि कौटुंबिक सहकार्यामुळे स्किझोफ्रेनियावर नियंत्रण मिळवता येते.