पावसाळ्यात किडनीच्या आजारांमध्ये होते वाढ
सर्व ऋतूंमध्ये ज्याची सर्वाधिक असोशीने वाट पाहिली जाते असा ऋतू म्हणजे पावसाळा. मात्र योग्य काळजी आणि खबरदारी घेतली गेली नाही तर या दिवसांत अनेक आरोग्यसमस्या निर्माण होऊ शकतात, ज्यातील काही समस्यांचा व्यक्तीच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. मान्सूनच्या काळात किडनीच्या समस्यांमध्ये अचानक वाढ झालेली दिसून येते, आणि यातील काही सर्वसामान्य समस्या खालीलप्रमाणे लेखात देण्यात आल्या आहेत.
फोर्टिस नेटवर्क हॉस्पिटल असलेल्या वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी विभागाचे डिरेक्टर आणि कन्सस्टन्ट-ट्रान्सप्लान्ट फिजिशियन डॉ. अतुल इंगळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
अक्युट किडनी इन्ज्युरी (AKI)
किडनीचे कार्य अचानकपणे मंदावणे; जंतूसंसर्ग, डीहायड्रेशन अर्थात शरीरातील आर्द्रतेची पातळी खाली जाणे आणि विषबाधा यांसारख्या अनेक कारणांमुळे AKI ही समस्या निर्माण होऊ शकते. ही स्थिती मान्सूनच्या काळात सर्वत्र अधिक प्रमाणात आढळून येते, कारण या दिवसांत लोकांचा दूषित पाणी व अन्नाशी संपर्क येतो. AKI च्या लक्षणांमध्ये थकवा जाणवणे, अतिसार वा डायरिया, डीहायड्रेशन आणि झोपाळल्यासारखे वाटणे या तक्रारींचा समवेश होतो.
लेप्टोस्पायरोसिस
बॅक्टेरिया संसर्गाचा एक प्रकार असलेला लेप्टोस्पायरोसिस हा आजार सर्वसाधारणपणे दूषित पाणी किंवा मातीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. त्वचा, डोळे, नाक किंवा तोंडावर कापल्यामुळे झालेल्या भेगा किंवा ओरखड्यांच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया शरीरामध्ये शिरू शकतात. लेप्टोस्पायरोसिसच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि उलट्या यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे किडनी निकामी होऊ शकते.
डेंगू
डेंग्यूच्या किडनीवर परिणाम
डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू या विषाणूजन्य आजारामुळे ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी किंवा अंगावर चट्टे उठणे अशी लक्षणे दिसू शकतात. डेंग्यूच्या् बहुतांश रुग्णांवर औषधांच्या सहाय्याने घरच्याघरीच उपचार करता येतो, काही प्रकरणांमध्ये मात्र डेंगूमुळे तीव्र स्वरूपाच्या गुंतागुंती उद्भवू शकतात. जसे की डेंग्यू हेमरहेजिक तापामुळे किडनी खराब होऊ शकते.
टायफॉइड
दूषित अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून पसरणारा हा एक बॅक्टेरियल संसर्ग आहे. टायफॉइड बॅक्टेरिया रक्तप्रवाहातून पसरतो, ज्यामुळे तो प्रचंड धोकादायक आणि प्राणघातक ठरू शकतो. बॅक्टेरियम साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे टायफॉइड होतो, ज्याच्या अनेक लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि थकवा यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये टायफॉइडमुळे किडनी निकामी होऊ शकते.
पावसाळी आजार झालेल्या व्यक्तींपैकी प्रत्येकालाच किडनीच्या समस्या जाणवत नाहीत ही महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवायला हवी. मात्र आधीपासूनच किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकार यंत्रणा ही नाजूक बनलेली असते, ज्यामुळे अशा व्यक्तींना वरील पावसाळी आजारांची लागण झाली तर त्यांच्याबाबतीत किडनीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता तुलनेने अधिक असते.
CKD शी संबंधित काही पावसाळी आजार कोणते?
ज्या स्थितीमध्ये किडन्यांची रक्तामधून अशुद्ध तत्त्वे फिल्टर करण्याची क्षमता नष्ट होते अशा स्थितीला क्रॉनिक किडनी डिजिज किंवा CKD असे म्हणतात आणि या समस्येमुळे व्यक्तीला हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका संभवू शकतो. या स्थितीमध्ये रक्तातील विषद्रव्ये इतर अवयवांना आणि उतींना हानी पोहोचवू शकतात.
कोणत्या आजारांचा समावेश
विविध तापांचा परिणाम
लक्षात ठेवा
तुम्हाला कोणत्याही पावसाळी आजाराची लक्षणे जाणवत असतील तर तत्काळ डॉक्टरांची भेट घेणे अत्यावश्यक आहे. लक्षात ठेवा लवकरात लवकर केलेले निदान आणि उपचार यामुळे किडनी निकामी होण्यासह इतर गंभीर गुंतागूंतींना प्रतिबंध होण्यास मदत होते. या ऋतूमध्ये किडनीचे संरक्षण करण्यास मदत करणाऱ्या काही इतर उपाययोजना पुढीलप्रमाणे
कशी काळजी घ्याल
तुम्हाला AKD किंवा CKD यातील कोणत्याही प्रकारचा किडनी आजार असल्यास वरील लक्षणांवर लक्ष ठेवा आणि त्यातील कोणतीही लक्षणे जाणवू लागल्यास विशेषज्ज्ञांची मदत घ्या. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्यातून लगेचच गंभीर संसर्ग होऊ शकतो तसेच या आजारांवर लवकरात लवकर उपचार करणे हे किडनीची अधिक हानी टाळण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.