Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील 70% महिला शांतपणे सहन करतात या समस्या… डॉक्टरांकडून जाणून घ्या कधी सावधान होण्याची गरज आहे?

महिलांमध्ये विविध स्त्रीरोगविषयक समस्या वाढताना दिसत आहेत. संकोच, जागरूकतेचा अभाव आणि वेळेअभावी अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. वेळीच योग्य सल्ला आणि काळजी घेतल्यास गंभीर आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2026 | 08:15 PM
भारतातील 70% महिला शांतपणे सहन करतात या समस्या... डॉक्टरांकडून जाणून घ्या कधी सावधान होण्याची गरज आहे?

भारतातील 70% महिला शांतपणे सहन करतात या समस्या... डॉक्टरांकडून जाणून घ्या कधी सावधान होण्याची गरज आहे?

Follow Us
Follow Us:
  • महिलांनी शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
  • मासिक पाळी, हार्मोनल बदल आणि स्त्रीरोगांबाबत मोकळेपणाने चर्चा होणे आणि जागरूकता वाढवणे आवश्यक आहे.
  • संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
आजकाल आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल घडून आले आहेत. बदलते जीवन, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे अनेक समस्या आपल्याला जाणवू लागतात पण बऱ्याचदा असे आढळून आले आहे की, भारतात महला वर्ग या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करतात. लहान गोष्ट आहे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि मग हिच समस्या पुढे जाऊन मोठे रुप धारण करते. अनेक आरोग्य समस्या महिलांसाठी सामान्य मानल्या जातात ज्यात वेदनादायक मासिक पाळी, पीसीओएस, फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस किंवा वारंवार होणारे संसर्ग यांचा समावेश होतो. या समस्या जरी महिलांसाठी सामान्य आणि नेहमीच्या असल्या तरी दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय आणणारा जास्त रक्तस्त्राव, अचानक वजन वाढणे, केस गळणे किंवा ओटीपोटात वेदना होणे या समस्या अजिबात सामान्य असू शकत नाहीत. तुम्हाला जर अशा समस्या जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा आणि यावर डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.

Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

अनेकदा माैनाचे कारण संकोच असते. मासिक पाळी किंवा योनिच्या आरोग्याबद्दल खुलून बोलले जात नाही आणि याविषयी चर्चा करणं लज्जास्पद मानलं जातं. काही महिलांनी वाटते की फार गंभीर स्थिती किंवा आजार नाही. बहुतेकदा असेच घडते. लहान शहरे आणि ग्रामीण भागात स्त्रीरोग तज्ञांची उपलब्धता मर्यादित असते, तर शहरांमध्ये व्यस्त जीवन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि यामुळेच त्यांचे आरोग्य आणखी धोक्यात येत असते.

तज्ञ काय म्हणतात?

स्त्रीरोगतज्ज्ञ यावर सांगतात की, महिलांच्या शरीरात अनेक बदल घडून येत असतात. असा अंदाज लावला जात आहे की, भारतात तब्बल ७० टक्क्यांहून अधिक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी स्त्रीरोगविषयक समस्या जाणवू लागतात मात्र जागरुकता नसल्याने किंवा वेळेवर तपासणी न केल्याने अनेक प्रकरणांमध्ये महिलांच्या समस्येचे निदान केले जात नाही. डाॅक्टरांच्या मते, महिलांनी आपल्या मासिक पाळीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मासिक पाळीचा त्रास सहन करण्यायोग्य असेल तर ते सामान्य आहे पण जर हा त्रास वाढत असेल, तुमच्या शरीरातून प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल दर तासाला तुम्हाला पॅड बदलण्याची वेळ पडत असेल तर, सात दिवसांहून अधिक काळ शरीरातून रक्तस्त्राव होत असेल तर वेळीच रुग्णालय गाठून यावर डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. चांगली स्वच्छता पाळा, परंतु यासाठी रासायनिक उत्पादनांचा वापर करणे टाळा कारण वजाईनामध्ये स्वतःच स्वतःला स्वच्छ ठेवण्याची ताकद असते.

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर हेअर डाय लावण्याऐवजी सुकलेल्या आवळ्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील काळेभोर

जीवनशैलीकडे लक्ष देणे महत्त्वाचे

आपल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. शरीरातील पोषण आणि वजन हे हार्मोनल संतुलनाशी देखील जोडलेले असते. आहारात लोह, प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्वांचा समावेश असणे गरजेचे आहे. वजन गरजेपेक्षा जास्त किंवा कमी असल्यास PCOS आणि वंध्यत्व सारख्या समस्यांचा धोका वाढत असतो. नियमित पुरेशी झोप आणि व्यायम हार्मोन्स संतुलिक करण्यास आपली मदत करतात. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिलांनी त्यांच्या डॉक्टरांनी शिफारस केल्यानुसार नियमित गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी आणि HPV लसीकरणाचा विचार करावा. याचबरोबर मानसिक आरोग्याचीही तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे. सततचा ताणतवाण, झोपेचा अभाव आणि चिंता मासिक पाळीवर थेट परिणाम करते. यामुळे महिलांनी आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे ज्यामुळे कोणती आरोग्य समस्या जाणवल्यास तिला ती टाळण्यास किंवा आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: 70 percent indian women suffer silently know warning signs from doctors lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?
1

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?

Postmortem: पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत…
2

Postmortem: पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत…

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर
3

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर

Eating Dal In Dinner : रात्री ‘डाळ’ खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर
4

Eating Dal In Dinner : रात्री ‘डाळ’ खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.