पोंगल 2025 कधी आहे? कसा साजरा केला जातो पोंगल? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा
पोंगल हा दक्षिण भारतमधील मुख्य सण आहे विशेषत: हा सण प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. हिवाळ्यातील हा सण मकर संक्रातीच्या आसपास येतो आणि चार दिवस साजरा केला जातो. हा सण शेती, निसर्ग आणि सूर्याच्या उपासनेशी संबंधित आहे. हा सण समृद्धी व आनंदाचे प्रतीक मानला जातो. आज आपण या सणाचे महत्त्व आणि यामागची रंजक अशी पौराणिक कथा जाणून घेणार आहोत.
पोंगलची परंपरा आणि त्याचे महत्त्व
पोंगल सणाची सुरुवात भोगी पोंगलने होते. या दिवशी घरातील अनावश्यक वस्तूंची होळी केली जाते आणि नवे सामान घरात आणले जाते. दुसऱ्या दिवशी सूर्य पोंगल साजरा केला जातो. यावेळी नवीन तांदळाचा भात तयार करून सूर्यदेवाला अर्पण करण्यात येतो. पोंगलच्या तिसऱ्या दिवशी मट्टू पोंगल साजरा केला जातो. यामध्ये गौमातेची व बैलांची पूजा करण्यात येते. या दिवशी नंदी देवतेचे पूजन महत्त्वाचे मानले जाते. चौथ्या दिवशी कानुम पोंगल साजरा केला जातो. सगळे कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन हा सण आनंदात साजरा करतात.
मकरसंक्रांतीच्या सणासाठी घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट तीळ गुळाचे लाडू
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
काय आहे पोंगल सणाची पौराणिक कथा?
पोंगल सणाशी संबंधित दोन महत्त्वाच्या कथा असल्याचे सागंतिले जाते. पहिली कथा भगवान शिव व नंदी यांच्याशी जोडलेली आहे. शिवाने नंदीला पृथ्वीवर लोकांसाठी संदेश देण्यासाठी पाठवले होते. नंदीने चुकून चुकीचा संदेश दिल्यामुळे शिवाने त्याला शेतात काम करण्याचा शाप दिला. तिसऱ्या दिवशी साजरा केला जाणाऱ्या मट्टू पोंगलला गायी व बैलांचे पूजन केले जाते.
दुसरी कथा भगवान ही तुमच्या आमच्या आवडीच्या कान्हाशी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाशी जोडलेली आहे. पौराणिनक कथेनुसार, इंद्रदेवाला आपल्या शक्तीचा गर्व झाला होता. यामुळे श्रीकृष्णाने इंद्रदेवाचा अहंकार मोडम्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. त्या घटनेनंतर निसर्ग पूजेसाठी पोंगल सणाची परंपरा सुरू झाली.
कसा साजरा केला जातो पोंगल
पोंगल हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी लोक सकाळी स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. नवीन भांड्यात दूध, तांदूळ, गूळ, काजू यांपासून खास “पोंगल” पदार्थ तयार केला जातो आणि सूर्यदेवाला अर्पण केला जातो. शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांची पूजा करतात. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन हा सण साजरा करतात, ज्यामुळे कौटुंबिक प्रेम व एकता वाढते. यावर्षी पोंगल सण 15 जानेवारीपासून सुरू होईल. पोंगल सण तामिळनाडूतील नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. तो केवळ कृषीचा सण नसून निसर्ग, देव आणि माणसातील समृद्ध संबंधांचा उत्सव आहे.