Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपण्यासाठी कोणती दिशा योग्य? ‘असं’ डोकं ठेवलं तर मिळतात फायदे, पाहा काय सांगतात आयुर्वेद तज्ज्ञ

आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी झोपण्याच्या दिशेची आयुर्वेदानुसार माहिती देताना सांगितलं, की `उत्तरेकडं डोकं करून कधीही झोपू नये.` याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या दिशेला झोपण्याचे परिणाम तपशीलवार सांगितले.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 26, 2022 | 10:08 AM
झोपण्यासाठी कोणती दिशा योग्य? ‘असं’ डोकं ठेवलं तर मिळतात फायदे, पाहा काय सांगतात आयुर्वेद तज्ज्ञ
Follow Us
Follow Us:

झोप ही रोजच्या दिनक्रमातील अतिशय महत्त्वाची क्रिया आहे. चांगली झोप मिळाली तर दिवसही चांगला जातो असं म्हणातात. तसेच रोजचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी रात्रीच्या वेळी चांगली झोप आवश्यक आहे. उत्पादकता, मूड, ऊर्जा पातळी, एकाग्रता सुधारण्यात, मानसिक आणि शारीरिक आरोग्य नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली झोप महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तम आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप आवश्यक आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. आयुर्वेदात झोपेविषयी काही नियम सांगितले आहेत.

योग्य झोप नसेल तर त्याचे गंभीरक परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. तुम्ही कमी प्रमाणात झोप घेत असाल किंवा तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर त्याचे परिणाम गंभीर आणि दीर्घ काळ टिकणारे असू शकतात. झोपण्यापूर्वी कॅफीनचं सेवन (चहा किंवा कॉफी) आणि स्क्रीनपासून (मोबाइल, लॅपटॉप) दूर राहणं, दीर्घ श्वास घेणं, दिवसभरातल्या इतर कामांमध्ये मर्यादित वेळेतच झोप घेणं, झोपण्याची दिशा आणि स्थिती यासारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असल्याचं आयुर्वेदात सांगितलं आहे.

आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी झोपण्याच्या दिशेची आयुर्वेदानुसार माहिती देताना सांगितलं, की `उत्तरेकडं डोकं करून कधीही झोपू नये.` याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या दिशेला झोपण्याचे परिणाम तपशीलवार सांगितले.

डॉ. भावसार म्हणाल्या, एखादी व्यक्ती उत्तर दिशेला (North) डोकं करून झोपत असेल, तर त्याला रात्रीच्या वेळी शांत झोप लागणार नाही आणि रात्रभर त्याच्या मनात नकळत सुरू असलेल्या द्वंद्वामुळे तो थकून उठण्याची शक्यता असते. कारण पृथ्वीच्या उत्तरेला माणसाच्या डोक्याप्रमाणेच पॉझिटिव्ह चार्ज (Positive Charge) असतो. दोन सकारात्मक चार्ज असलेले चुंबक मनात अस्वस्थता निर्माण करू शकतात. आयुर्वेदिकदृष्ट्या असं चुंबकत्व रक्ताभिसरण, ताण-तणाव आणि मनामध्ये अस्वस्थता निर्माण करतं.

तुम्ही एखाद्या गोष्टीचं शिक्षण घेत असाल किंवा तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही पूर्व (East) दिशेला डोकं करून झोपणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या दिशेला झोपल्यानं रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याशिवाय या दिशेला झोपल्याने एकाग्रता सुधारते, ध्यानात्मक झोप लागते आणि उत्तम आरोग्य लाभतं.

… तर पडतात वाईट स्वप्नं

वास्तुशास्त्रानुसार, पश्चिम दिशा (West) ही प्रयत्नशील दिशा मानली जाते. या दिशेला झोपल्याने झोप येते; पण त्रासदायक स्वप्नंही (Dream) पडतात. तुम्हाला शांत झोपेची गरज असेल तर ती या दिशेला मिळणं केवळ अशक्य आहे.

गाढ झोपेसाठी दक्षिण दिशा आहे उत्तम

दक्षिण दिशेला (South) डोकं करून झोपल्यास गाढ झोप लागते. या दिशेला निगेटिव्ह चार्ज असतात आणि तुमचं डोकं पॉझिटिव्ह चार्ज्ड असतं. त्यामुळे तुमचं डोकं आणि दिशा यांच्यात योग्य आकर्षण निर्माण होतं. उत्तर दिशेला डोकं करून झोपल्याने शरीरातली ऊर्जा बाहेर पडत नाही. त्यामुळे आरोग्य, सुख आणि समृद्धी वाढवणाऱ्या ऊर्जेच्या दिशेने म्हणजेच दक्षिण दिशेला डोकं करून झोपावं.

Web Title: Which direction is good for sleeping read what ayurved experts says nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2022 | 09:59 AM

Topics:  

  • ayurvedic tips
  • Health Tips

संबंधित बातम्या

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
1

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
2

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
3

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
4

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.