Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बघायला जाताना गर्दीत लहान मुलांची, वयस्कर लोकांची ‘अशा’ पद्धतीने घ्या काळजी,सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दीमध्ये गेल्यानंतर लहान मुलांची योग्य काळजी घ्यावी. मुलांना कुठेही एकट्यात सोडू नये. मुलांच्या सुरक्षितेची काळजी घेत बाप्पाचे दर्शन घ्यावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 28, 2025 | 03:05 PM
गणपती बघायला जाताना गर्दीत लहान मुलांची, वयस्कर लोकांची 'अशा' पद्धतीने घ्या काळजी

गणपती बघायला जाताना गर्दीत लहान मुलांची, वयस्कर लोकांची 'अशा' पद्धतीने घ्या काळजी

Follow Us
Close
Follow Us:

गणपती बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या आनंद आणि जलौषात पार पडला आहे. बाप्पाच्या येण्यामुळे सगळीकडे भक्तीमय वातावरण झाले आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये सगळीकडे आरत्यांचे स्वर ऐकू येतात. बाप्पाच्या आगमनासाठी केलेले खास डेकोरेशन पाहण्यासाठी आणि बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी घरात अनेक पाहुणे मंडळी येतात. याशिवाय मुंबईमध्ये प्रसिद्ध मंडळांमधील बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, गणेश गल्ली, तेजुकाया इत्यादी मुंबईतील अतिशय फेमस मंडळ आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी स्थापना झालेल्या गणेश मंडळांना मुंबईमध्ये विशेष महत्व आहे.(फोटो सौजन्य – istock)

Navi Mumbai : दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई मनपा सज्ज; प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं नागरिकांना आवाह

मुंबईतील नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागच्या गणपती बाप्पाची ओळख आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागमध्ये दाखल होतात. बाप्पावरील श्रद्धा आणि भक्तीपोटी बाप्पाच्या आगमनाच्या आधल्या दिवसापासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी असते. गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याचदा लहान मुलांचा हात सुटून जातो किंवा लहान मुलांसह वयस्कर वृद्ध गर्दीमध्ये हरवून जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गर्दीमध्ये गेल्यानंतर लहान मुलांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबद्दल काही महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत.

लहान मुलांची, वयस्कर लोकांची गणपती बघायला जाताना ‘अशा’ पद्धतीने घ्या काळजी:

मुलांच्या कपड्याना लेबल लावावा:

गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन कुठेही फिरायला गेल्यानंतर त्यांच्या कपड्यांना लेबल लावावे. ज्यामुळे गर्दीमध्ये मुलांचा हात सुटल्यानंतर किंवा कुठेही चुकामुक झाल्यानंतर तुम्ही मुलांना सहज शोधू शकता. याशिवाय मुलांच्या खिशात मोबाईल नंबर असलेले कार्ड किंवा बिझनेस कार्ड तुम्ही ठेवू शकता. यामुळे हरवलेली मुलं लगेच सापडतील.

कपड्यांचा रंग लक्षात ठेवणे:

लहान मुलांना कुठेही गर्दीच्या ठिकाणी फिरायला घेऊन गेल्यानंतर त्यांच्या कपड्यांचा रंग लक्षात ठेवावा. यामुळे हरवलेली मुलं शोधण्यास मोठी मदत होईल. कुठेही बाहेर जाताना सहज ओळखता येतील अशाच रंगाचे कपडे मुलांना घालावेत. यामुळे घाईगबडीमध्ये मुलांना शोधणे सहज सोपे होईल.

फोटो काढणे:

बाहेर पडताना मनःशांती मिळवण्यासाठी तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुमच्या मुलांचे काही फोटो तुमच्या मोबाईल फोनवर काढा. यामुळे बेपत्ता मुलं सहज शोधात येतील. गणपती मंडळात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना, सुरक्षा रक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांना तुम्ही सहजपणे फोटो दाखवू शकता आणि वर्णन करू शकता.

Richest Ganesh Mandal : ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ; 474 कोटींच्या विमा पॉलिसीने बनवला विक्रम

एका जागी शांत उभे राहणे:

गर्दीमध्ये बऱ्याचदा आई, वडील किंवा लहान मुलांना एकमेकांपासून वेगळे होतात. अशावेळी हरवलेल्या ठिकाणी एका जागेवर शांत उभे राहणे आवश्यक आहे. यामुळे गोंधळ होत नाही. त्यामुळे मुलांना घेऊन गर्दीच्या ठिकाणी फिरण्यापेक्षा त्यांना आरामदायी वाटेल अशा ठिकाणी फिरण्यास घेऊन जावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: While going to see ganapati take care of children elderly people in the crowd like this important tips for safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati Festival
  • safety tips

संबंधित बातम्या

Navi Mumbai :  दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई मनपा सज्ज; प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं नागरिकांना आवाह
1

Navi Mumbai : दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई मनपा सज्ज; प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं नागरिकांना आवाह

Mumbai Famous Ganpati Mandal: “ही शान कुणाची लालबागच्या राजाची”; 90 वर्षांचा इतिहास असलेल्या ‘या’ राजाची स्थापनेची रंजक गोष्ट
2

Mumbai Famous Ganpati Mandal: “ही शान कुणाची लालबागच्या राजाची”; 90 वर्षांचा इतिहास असलेल्या ‘या’ राजाची स्थापनेची रंजक गोष्ट

पृथ्वी शॉ कोणाला डेट करत आहे? गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही ‘महिला’ दिसली त्याच्यासोबत ; Photo Viral
3

पृथ्वी शॉ कोणाला डेट करत आहे? गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही ‘महिला’ दिसली त्याच्यासोबत ; Photo Viral

नवीन हेअर स्टाईल, क्लीन शेव्हमध्ये दिसला ‘धुरंधर’ अभिनेता, दीपिकासोबत घेतले बाप्पाचे दर्शन; पाहा VIDEO
4

नवीन हेअर स्टाईल, क्लीन शेव्हमध्ये दिसला ‘धुरंधर’ अभिनेता, दीपिकासोबत घेतले बाप्पाचे दर्शन; पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.