Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात रक्तदाब उन्हाळ्याच्या तुलनेत वाढतो का? नक्की वाचा

हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यानाचा सराव करा. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार आणि दिनचर्येत बदल केल्याने बीपी नियंत्रणात ठेवणे सोपे होते

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 04, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रक्तदाबाचा जास्त त्रास केव्हा होत असेल? हिवाळ्यामध्ये कि उन्हाळ्यामध्ये? नेमकं कोणता ऋतू रक्तदाबाच्या त्रासाचा खरा मित्र असून, या त्रासाच्या वाढीत साथ देतो? अशा प्रश्न सध्याच्या काळात पडणे सामान्य आहे. यास कारण कि वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. या वाढत्या थंडीचा अनेकांना त्रास होत आहे. यात रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांचा प्रमुख सहभाग आहे. चला तर मग जाणून घेऊयात, नेमकं कोणत्या ऋतूमध्ये रक्तदाबाचा त्रास वाढतो? हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होतात आणि रक्ताभिसरणासाठी अधिक शक्ती लागते. याचा परिणाम म्हणून रक्तदाब (बीपी) वाढतो. वातावरणातील बदलांमुळेही रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतो. डॉक्टर मनीष अग्रवाल, ज्यांना कार्डियोलॉजीमध्ये 15 वर्षांचा अनुभव आहे आणि ते कोलकात्यातील नारायणा हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ सल्लागार आहेत, यांच्या मते, रक्तवाहिन्यांवर अधिक ताण आल्याने हिवाळ्यात बीपी वाढण्याची शक्यता जास्त असते.

2025 मध्‍ये स्‍वत:च्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याला द्या प्राधान्य, कसा असावा आहार

हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत. नियमितपणे बीपी मोजा आणि तापमानातील बदल लक्षात ठेवा. आहारात तेलकट, तुपकट पदार्थ कमी करून संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. थंडीत शारीरिक हालचाल कमी होऊ देऊ नका, कारण हालचाल कमी झाल्यामुळे वजन वाढते, ज्याचा रक्तदाबावर परिणाम होतो. औषधांबाबत सावधगिरी बाळगणेही गरजेचे आहे. नाक मोकळे करण्यासाठी वापरण्यात येणारी डिकॉन्गेस्टंट औषधे रक्तदाब वाढवू शकतात, तर काही प्रकारच्या एंटीहिस्टामाइन औषधांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, काही खोकल्याच्या औषधांमध्ये रक्तदाब वाढवणारे घटक असू शकतात, त्यामुळे संयोजन औषधे वापरताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

रक्तदाब नियंत्रणासाठी नियमित व्यायाम, मीठाचे प्रमाण कमी ठेवणे, पुरेशी झोप घेणे, आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा सराव करणे हे अत्यंत उपयुक्त ठरते. व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावर येणारा ताण कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवल्यास शरीरात पाणी साचण्याची शक्यता कमी होते, ज्याचा सकारात्मक परिणाम रक्तदाबावर होतो. याशिवाय, पुरेशी झोप घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, कारण झोपेच्या अभावामुळे शरीरावर ताण येतो आणि रक्तदाब वाढू शकतो. तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगासारख्या उपायांचा सराव केल्याने मन शांत होते, शरीर विश्रांती घेतं, आणि रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो.

भविष्याला आकार देताना: मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारांतील परिवर्तन

हिवाळ्यात रक्तदाबाचा प्रभाव कमी करण्यासाठी या उपायांबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. हिवाळ्यात औषधांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असल्याने, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचारात आवश्यक बदल करावेत. तसेच, आपली दिनचर्या सुधारून नियमित वेळा सांभाळणे, सकस आहार घेणे, आणि थंडीतही सक्रिय राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. या सगळ्या उपायांनी केवळ रक्तदाबच नाही तर एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Web Title: Why does blood pressure increase in winter compared to summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • blood pressure

संबंधित बातम्या

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक
1

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू
2

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Hypertension म्हणजे काय? वाढत्या उच्च रक्तदाबाचा शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, जाणून घ्या सविस्तर
3

Hypertension म्हणजे काय? वाढत्या उच्च रक्तदाबाचा शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.