
photo- yandex
Tea Side Effects: चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण करता? थांबा! आरोग्य जपण्यासाठी काय आहे योग्य नियम?
हिवाळ्यात तापमान कमी झाल्यावर, शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. याला व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन (vasoconstriction) म्हणतात. यामुळे रक्तप्रवाहादरम्यान रक्तवाहिन्यांवरील दाब वाढतो आणि ब्लड प्रेशर वाढू शकतो.
थंडीमुळे लोक सकाळचे चालणे, व्यायाम आणि इतर शारीरिक हालचाली कमी करतात. जास्त वेळ बसल्याने आणि कमी हालचालींमुळे वजन वाढू शकते. याचा परिणाम ब्लड प्रेशरवर होतो.
थंडीच्या दिवसांत अनेकांना भजी, पराठे, खारट आणि मसालेदार पदार्थ खायला आवडतात. यामध्ये मीठ आणि अनहेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असू शकते. अतिरिक्त सोडियमच्या सेवनाने शरीरात पाणी साठू शकते. यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका वाढतो.
हिवाळ्यात शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे आणि कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे काही लोकांचे वजन वाढू लागते. जास्त वजनामुळे शरीराला रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागू शकते. यामुळे ब्लड प्रेशर धोका वाढतो.
हवामानातील बदल, दैनंदिन दिनचर्येतील व्यत्यय आणि पुरेशी झोप न मिळणे यांचाही ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो. सततच्या तणावामुळे शरीरात असे हार्मोन्स रिलीज होतात. यामुळे काही काळासाठी ब्लड प्रेशर वाढू शकतो.
काही लोक, हिवाळ्यात बरे वाटत असल्यामुळे, बीपीची औषधे घेणे कमी करतात. असे करणे धोकादायक ठरू शकते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषधं घेणे थांबवू नये किंवा त्याचा डोस बदलू नये. अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Ans: थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
Ans: कमी शारीरिक हालचाल, वजनवाढ, जास्त मीठ, तणाव आणि अपुरी झोप ही काही कारणे आहेत.
Ans: नियमित व्यायाम करा, मीठ कमी खा आणि रक्तदाबाची नियमित तपासणी करा.