
मकरसंक्रांतीच्या एक दिवसआधी भोगी का साजरा केली जाते?
संपूर्ण देशभरात मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी साजरा केली जाते. यादिवशी महिलांना केस धुवण्याचा सल्ला घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती कायमच देतात. देवाची पूजा केल्यानंतर घरात हंगामातील मिक्स भाज्यांचा वापर करून चविष्ट भाजी बनवली जाते. या भाजीसोबत खाण्यासाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवताना. कारण थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्ण पदार्थांची आवश्यकता असते. तीळ आणि वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा केला जातो. याशिवाय दक्षिण भारतात भोगी सणाला खूप जास्त महत्व आहे. हा दिवस उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. जुन्या गोष्टींना दुर्लक्ष करुन नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते. चला तर जाणून घेऊया भोगीचे महत्व. पहा व्हिडिओ.(फोटो सौजन्य – pinterest)
मकर संक्रांतीच्या आधल्या दिवशी भोगी साजरा केली जाते. भोगी याचा शब्दशहा अर्थ उपभोग घेणे. या काळात काही खास भाज्या येतात. त्यात पावटा, वाल, मटार, तुरीच्या शेंगा, हरभरा, बोर इत्यादी भाज्यांची मिक्स भाजी बनवली जाते. ज्याला भोगीची भाजी असे म्हणतात. ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. यानिमित्ताने विशेष भाज्यांचा आस्वाद घेतला जातो. भोगी सण केवळ महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. हा सण शेतात आलेल्या पिकांसाठी भगवान इंद्राचा आशीर्वाद मानला जातो. ‘जो न खाई भोगी तो सदा रोगी’ असे सुद्धा म्हंटले जाते. त्यामुळे जी व्यक्ती भोगीच्या दिवशी या भाजीचे सेवन करत नाही तो आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या गोष्टी गमावतो, असे म्हणले जाते. त्यामुळे भोगीच्या दिवशी भाजीचे सेवन आहारात करावे.
पौराणिक कथेनुसार, इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिके पिकवी धनधान्य वाढावे यासाठी प्रार्थना केली होती. त्यामुळे पृथ्वीवर कायम धनधान्याची बरकत व्हावी वर्षभर पिके यावी म्हणून भोगीचा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हिंदू धर्मात सर्वच सणावारांना विशेष महत्व आहे. तसेच भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकरसंक्रांत असते. घरात सुगड पूजन झाल्यानंतर महिलांना हळदीकुंकू देऊन वाण दिले जाते. ‘तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असा संदेश दिला जातो.