
नात्यामधील विश्वास वाढवण्यासाठी जोडीदाराला द्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा
जगभरात सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या वीकमध्ये येणारा पाचवा दिवस म्हणजे प्रॉमिस डे. दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रेम करणारे जोडपे, मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबातील सदस्य एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे, नातं जपण्याचे आणि विश्वास टिकवण्याचे वचन देतात. नात्यांमधील विश्वास आणि प्रेम वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याशिवाय प्रॉमिस डे म्हणजे नात्यातील विश्वास आणखीनच मजबूत आणि घट्ट करण्याचा दिवस. एकमेकांना वचन दिल्यामुळे नात्यातील विश्वास वाढतो, कमी होतात, भावनिक नाते अधिक घट्ट होते, नात्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रियकराला या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून प्रॉमिस डे साजरा करा.(फोटो सौजन्य – istock)
प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे,
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय
Happy Promise Day
तू जिथे जाशील
मी तिथे येईन
सावलीने जरी सोडली साथ
तरी अंधारात मी तुझा प्रकाश होईन!
Happy promise day
चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील प्रेमाचा पारवा
या नशिल्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा…
वचन दे तुला मला कधीही न ये हा दुरावा
Happy promise day
ह्याच जन्मी नाही तर
प्रत्येक जन्मी तुच मला पाहिजे
माझ्या हातात नेहमी
एक तुझाच हात पाहिजे…
Happy promise day
मला तुझ्याकडून फक्त
एकच वचन हवंय,
कितीही भांडण झालं तरी
आपलं नातं जीवापाड प्रेम करणारे हवंय
Happy promise day
जेव्हा भेट होईल आपली
तेव्हा एक वचन तुझ्याकडून हवंय
ह्याच जन्मी नव्हे तर
प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस
Happy promise day
आजच्या दिवशी एक वचन तुला माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत
साथ मात्र तुलाच देईन
Happy Promise Day
प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे,
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय
मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन
मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन
Happy Promise Day
आज स्वतःलाच एक वचन देत आहे.
आयुष्यात कितीही नवे मित्रमैत्रिणी येवोत
पण जुन्या मित्रमैत्रिणींना कधीही सोडणार नाही
आणि विसरणार नाही
Happy Promise Day
तुझा रूसवा, तुझा फुगवा सगळं मंजूर आहे मला,
पण मला कधीही सोडून जाणार नाहीस हे वचन दे मला
Happy Promise Day
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही
तू आहेस तर मी आहे,
तुला आयुष्यात कायम असाच साथ देत राहीन
हे माझं वचन आहे
Happy Promise Day
तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही
हे आज वचन देतो तुला
Happy Promise Day
आयुष्यभर असावी तुझीच साथ हीच एक इच्छा आहे,
निभावेन तुझी साथ देतो वचन तुला आज
Happy Promise Day
मला चंद्र आणि तारे आणून देण्याचं वचन नकोय,
तर कायम तू साथ देशील हेच वचन दे
Happy Promise Day
तुझा हात जो आता कायम धरला आहे
तो कधीही न सोडण्यासाठी
Happy Promise Day
“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुला साथ देईन, प्रत्येक दु:खात मी तुझा हात सोडणार नाही. प्रॉमिस डे २०२६ च्या शुभेच्छा!”
“कितीही भांडण झालं तरी, आपलं नातं जीवापाड प्रेम करणारं असेल, हे माझं वचन तुला! Happy Promise Day!”
“मी माझी सर्व वचने पाळण्याचे वचन देतो/देते. मी वचन देतो की मी तुला कधीही सोडणार नाही, नेहमी तुझ्याबरोबर राहीन. Happy Promise Day!”
“सुखात तर सगळेच सोबत असतात, पण मी तुझ्या दुःखात तुझी सावली बनून राहीन, हे माझं वचन आहे. प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!”