
चाळीशीनंतर स्त्रीयांना विविध विकारांना सामोरं जावं लागतं. घर आणि ऑफीस ही तारेवरची कसरत साधताना ती स्वतःच्या खाण्यापिण्या बाबत खूप निष्काळजी असतात.यामुळे एका विशिष्ट वयानंतर पुरुषांपेक्षा महिलांना आरोग्याच्या समस्यांना अधिक सामोरे जावे लागते. या समस्या टाळण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी वयाच्या 40 वर्षांनंतर महिलांनी काही पूरक आहार घेणे आवश्यक आहे. (diet after 40)(woman health)
चाळीशीनंतर स्त्रीयांची ताकद हळूहळू कमी होते आणि शरीराला पोषक घटक मिळत नाहीत. अशावेळी काही सप्लीमेंट्स पोषक तत्वांची कमतरता भरुन काढण्याचे काम करतात. चला तर जाणून घेऊया चाळीशीनंतर कोणत्या प्रकाराचा आहारात समावेश करावा….
व्हिटॅमिन बी 12 हे एक असे व्हिटॅमिन आहे जे आपल्या हृदय, हाडे, त्वचा आणि डोळ्यांसाठी लाभदायक असते. हे केवळ आपल्याला अनेक आजारांपासूनच दूर ठेवत नाही तर हृदय, डोळे आणि त्वचाही निरोगी ठेवण्याचे काम करते. व्हिटॅमिन बी 12 लीन मीट, अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ इत्यादीं मधून सहजपणे मिळते पण वयाच्या 40शी नंतर पोटातील आम्लाची पातळी कमी होते. ज्या स्त्रिया व्हिटॅमिन बी12 आणि बी6 आणि फॉलिक अॅसिडने समृद्ध आहार घेतात त्यांच्यातील मॅक्युलर डीजनरेशनचा धोका 34 टक्क्यांनी कमी होतो.
प्रोबायोटिक्स
प्रोबायोटिक्स भले व्हिटॅमिन्स आणि खनिज प्रकारात येत नाहीत. पण,चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी याचं सेवन खूप गरजेचे आहे. यामुळे तुम्ही तुमचे हृदय निरोगी राखू शकता, पोटांच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.प्रोबायोटिक्सचा सर्वात चांगला स्त्रोत आहे दूध, दही आणि सोया…तसंच, प्रोबायोटिक्ससाठी सप्लीमेंट
ओमेगा 3 फॅटी अॅसिड तुमच्या शरीराला एक किंवा दोन नाही तर अगणित फायदे देते. वय वाढले की हृदय आणि हाडांची काळजी घेण्यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड महत्त्वाचे आहे. अनेक संशोधनामधून हे दिसून आले आहे की ओमेगा 3 फॅटी अॅसिडच्या माध्यमातून बॅड कोलेस्टेरोल कमी केले जाऊ शकते.
वयासोबतच व्हिटॅमिन डी ची कमतरता वाढत जाते आणि त्यामुळे शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होतो. व्हिटामिन डी कमी झाल्याने हृदयरोग, मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढू लागतो.आहाराच्या माध्यमातून व्हिटामिन डी ची तुमची कमतरता भरून निघणार नाही. अशावेळी तुम्ही व्हिटामिन डी सप्लीमेंट्सचा आधार घेऊ शकता.
कॅल्शियम
कॅल्शियम आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे. यामुळे केवळ हाडेच मजबूत राहतात असे नाही तर यामुळे स्नायू, तंत्रिका तंत्र आणि हृदय सुद्धा स्वस्थ राहते. पण वाढत्या वयासोबत शरीरातील कॅल्शियम सुद्धा कमी होऊ लागते. यामुळे हाडांना इजा होण्याचा धोका असतो. रोज कॅल्शियमयुक्त आहार आणि सप्लीमेंट्स घेऊ शकता.
जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना एका मर्यादात वयानंतर रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. मॅग्नेशियम सप्लिमेंटबरोबरच आहारातून मॅग्नेशियम घ्यावे.