
कोणी सांगितले फक्त शारीरिक संबधातूनच AIDS पसरतो, 'या' कारणांमुळे व्हाल संक्रमित, असा करा बचाव
जगभरात असे अनेक आजार आहेत, ज्यांच्याबद्दल हवी तेवढी जागरूकता होत नाही. यातीलच एक आजार म्हणजे एड्स. एड्स हा खूप गंभीर आजार आहे, ज्याच्याबद्दल लोकांना जास्त माहिती नसते. अनेकांना आजही हा आजार काय आहे, तो कोणाला कोणत्या कारणांमुळे होतो, याबद्दल माहिती नाही आहे. तसेच समाजात एड्स झालेल्या व्यक्तीला तितकासा मान मिळत नाही. त्याच्याकडे तूच्छ नजरेने पाहिले जाते. म्हणूनच या आजराबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्ह्णून जगभरात 1 डिसेंबरला World Aids Day साजरा केलं जातो.
अनेकदा एड्सबद्दल लोकांना अर्धसत्य माहित असते. त्यातही अनेकांना वाटते की एड्स हा आजार फक्त शारीरिक संबंधातूनच पसरतो. आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे खोटे आहे.
सामान्यतः लोक या आजाराबद्दल उघडपणे बोलण्यास कचरतात. याचे कारण लोकांचा असा समज आहे की एड्सचा बळी केवळ शारीरिक संबंधांमुळेच होतो. ही नाण्याची एकच बाजू आहे, दुसऱ्या बाजूबद्दल तुम्हाला ठाऊक असणे गरजेचे आहे.
आज एड्स दिनानिमित्त आम्ही तुम्हाला हा आजार काय आहे आणि शारीरिक संबंधांशिवाय इतर कोणत्या कारणांमुळे लोकं याला बळी पडू शकतात याबद्दल सांगणार आहोत. गुरुग्रामच्या सीके बिर्ला हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या संचालक डॉ. आस्था दयाल याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
WHO च्या मते, एड्स हा एक धोकादायक आजार आहे, जो मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजेच एचआयव्ही विषाणूमुळे एखाद्या व्यक्तीला त्याचा बळी बनवतो. हा विषाणू शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. ऍक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) हा एचआयव्ही विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाचा शेवटचा टप्पा आहे.
शारीरिक संपर्कातून एड्स पसरू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु, शारीरिक संबंध न ठेवताही हा आजार एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो. हे मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) मुळे होते, जे विशिष्ट शारीरिक द्रवांद्वारे पसरते. एचआयव्ही-संक्रमित रक्ताने दूषित सुई किंवा सिरिंज वापरणे, संक्रमित रक्त किंवा ब्लड प्रोडक्ट्सच्या संपर्कात येणे आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह आईकडून गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणात किंवा स्तनपान करवण्याच्या काळात तिच्या मुलापर्यंत हा आजार पसरू शकतो.
याशिवाय, संसर्गग्रस्त सुई टोचल्यामुळे नकळत किंवा अचानक झालेल्या दुखापतीमुळेही आरोग्य कर्मचारी एचआयव्हीच्या संपर्कात येऊ शकतात. लक्षात ठेवा, HIV ग्रस्त व्यक्तीला मिठी मारून, हस्तांदोलन केल्याने किंवा अन्न खाल्ल्याने HIV पसरत नाही. तसेच, ते हवा, पाणी किंवा कीटकांच्या चाव्याव्दारे सुद्धा पसरत नाही.