एड्स दिवस का साजरा केला जातो?
1 नोव्हेंबर ला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये एड्स आजाराबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाला जगभरात सगळीकडे विशेष महत्व आहे. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसच्या संसर्गामुळे एड्स हा सगळीकडे पसरला आहे. एड्स हा साथीचा आजार असून एकाच वेळी अनेकांना होण्याची शक्यता असते. 1988 मध्ये पहिल्यांदा जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागे विशेष कारण आहे. एड्स बाधित लोकांना स्वीकारण्यासाठी समाजात चांगले वातावरण निर्माण करण्याचा उद्देश ठेवून हा दिवस साजरा केला जात आहे. आज आम्ही तुम्हाला जागतिक एड्स दिवस का साजरा केला जातो? या दिवसाला काय विशेष महत्व आहे? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
संपूर्ण जगभरात एड्स दिवस साजरा करण्यामागे थॉमस नेटर आणि जेम्स डब्लू. बन यांनी 1987 मध्ये संकल्पना मांडली होती. थॉमस नेटर आणि जेम्स डब्ल्यू. बन हे दोघंही स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या एड्स ग्लोबल प्रोग्रामसाठी सार्वजनिक माहिती अधिकारी म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी एड्स दिनाची संकल्पना डॉ. जोनाथन मुन यांच्याजवळ शेअर केली. त्यानंतर त्यांनी या संकल्पनेला मान्यता दिली आणि 1 नोव्हेंबरपासून जागतिक एड्स दिवस साजरा केला जाऊ लागला. एड्स हा आजार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना होण्याची शक्यता असते. त्यानंतर 1997 पासून जागतिक एड्स मोहीम सुरू करण्यात आली.
एचआयव्ही एड्स हा गंभीर आजार आहे. हा आजार झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. हा साथीचा आजार असून एका व्यक्तीला झाल्यानंतर अनेकांना होण्याची शक्यता असते. एड्सचे पूर्ण नाव ‘अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम’ असे आहे. हा एक घातक विषाणू आहे. हा आजार व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम करतो. या आजारात शरीर सामान्य आजारांशी लढण्यात असमर्थ ठरते.
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सर्वच व्यायोगटातील व्यक्तींमध्ये एड्स या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. एड्स दिवस साजरा करण्यामागे असलेला उद्देश म्हणजे एचआयव्ही एड्समुळे पसरलेल्या संसर्गाबद्दल प्रबोधन करणे. जगभरात या आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या आजारावर अजूनही कोणती लस नाही. जगभरात 36.9 दशलक्ष लोक एचआयव्ही एड्स या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. शिवाय भारतामध्ये 2 .1 दशलक्ष रुग्ण आढळून आले आहेत.