
न्यूमोनियामुळे होईल त्रासदायक
न्यूमोनियामध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज येते. फुफ्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या-छोट्या पिशव्या (Air sacs) असतात. यांना ‘अल्वेओली’ असं म्हटलं जातं. यामध्ये जंतू संसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेताना अत्यंत त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा एक किरकोळ आजार किंवा सामान्य सर्दी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते ज्यामुळे भविष्यात गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
न्यूमोनिया प्रामुख्याने विविध रोगजनकांमुळे होतो. यामध्ये जीवाणू, विषाणू किंवा बुरशी संसर्गाचा समावेश असतो. ताप, थंडी वाजणे, थकवा येणे, दम लागणे, छातीत दुखणे, खोकला, शिंका येणे, छातीत घरघर होणे यांसारख्या अनेक लक्षणं दिसून येतात. दुर्लक्ष केल्यास न्यूमोनिया हा जीवघेणा ठरू शकतो. ज्या लोकांना हा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे त्यांनी सावध असले पाहिजे जसे की लहान मुले, ज्येष्ठ नागरिक ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना जुनाट आजार आहेत. याबाबत अनेक गैरसमजूती आढळून येतात ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि निदान व उपचारास विलंब होतो. डॉ. विश्रृत जोशी, पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट,अंकुरा हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रेन, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
न्यूमोनिया संबंधित गैरसमजूती कोणत्या?
गैरसमज: न्यूमोनिया हा नेहमीच गंभीर असतो आणि त्याला रुग्णालयात राहण्याची आवश्यकता असते.
वास्तविकता: न्यूमोनिया सर्व प्रकरणे गंभीर नसतात किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासतेच असे नाही. न्यूमोनियाचे निदान झालेले बरेच लोक घरच्या घरी लवकर बरे होऊ शकतात. हाताच्या स्वच्छतेचे पालन करणे, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्ससह संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. विशेषत: लहान मुलं आणि वयोवृध्द रुग्णांना याकडे दुर्लक्ष केल्यास न्यूमोनिया जीवघेणा ठरू शकतो.
हेदेखील वाचा – व्हायरल न्यूमोनियावरील लसीकरण, कोणत्या लस घेणे आवश्यक सांगताहेत तज्ज्ञ
गैरसमज: न्यूमोनिया हा संसर्गजन्य आहे
न्यूमोनियाबाबत गैरसमजुती नक्की काय आहेत
वास्तविकता: न्यूमोनिया सारखे संक्रमण थेट संसर्गजन्य नसतात. न्यूमोनिया होण्यास कारणीभूत असलेले विषाणु अनेकांमध्ये सहज पसरू शकतात. ते खोकला, शिंकणे आणि आजारी लोकांच्या संपर्कातून पसरू शकतात. एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की या जंतूंच्या थेट संपर्कात आलेल्या प्रत्येकाला हा संसर्ग होण्याची शक्यता नाही. हे मुख्यतः एखाद्याच्या रोगप्रतिकारक शक्तीवर आणि त्यांच्या एकूण आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते.
गैरसमज: न्यूमोनिया हा केवळ बॅक्टेरियामुळे होतो
न्यूमोनिया कसा होतो
वास्तविकता : न्यूमोनिया हा जीवाणू, विषाणू आणि बुरशीसह विविध रोगजनकांमुळे होऊ शकतो. सर्वात सामान्य जीवाणू जे न्यूमोनियासाठी ओळखले जातात ते म्हणजे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. परंतु हे फ्लू, कोविड-19 किंवा रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) सारख्या विषाणूंमुळे देखील होऊ शकते, ज्यामुळे व्हायरल न्यूमोनिया होतो.
गैरसमज: न्यूमोनिया हा दुर्मिळ आहे, म्हणून लोकांना याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही
वास्तविकता: न्यूमोनिया सारखे फुफ्फुसाचे संक्रमण भारतात सामान्य आहे, विशेषत: फ्लूच्या संसर्गात याचा अधिक धोका असतो. न्युमोनियाची प्रकरणे सर्रासपणे वाढत आहेत ज्यामुळे आरोग्याविषयक चिंता वाढली आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर परिणाम करते व रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक, लहान मुले आणि वयोवृद्धांनी सावध राहणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणे ठरू शकते.