10th SSC Board Result 2025 Big success for students in Madha
कुर्डुवाडी : माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२५चा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विभागनिहाय निकाल देखील हाती आला आहे. यामध्ये माढा तालुक्यात एकूण ५ हजार ६१ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.यापैकी ४ हजार ६५४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल ९३ .४७ टक्के लागला आहे.
तालुक्यामध्ये एकूण २७ शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. न्यू इंग्लिश स्कूल घोटी,वसंतराव नाईक विद्यालय महिसगांव,विष्णुपंत पाटील प्रशाला उपळाई खु.,न्यु इंग्लिश स्कूल पिंपळखुंटे,आर.एस.संस्था महात्मा फुले विद्यालय वरवडे,भैरवनाथ हायस्कूल केवड,
ब्रह्मनाथ विद्यामंदिर (अंजनगाव उ),ले.सुगंधाताई पाटील विद्यालय सा.चिंचोली, शरद विद्यालय बारलोणी,न्यू इंग्लिश स्कूल तुळशी , स्व.सुगंधाताई पाटील विद्यालय भुताष्टे,मा.अजित पवार हायस्कूल शिराळा,कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्य विद्यालय पडसाळी,संभाजीराव चव्हाण माध्य. विद्यालय विठ्ठलवाडी ,प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे ,स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव पाटील प्रशाला जामगांव,श्रीकृष्ण विद्यालय वेताळवाडी,कर्मवीर लोहकरे माध्य विद्यालय उजनी, श्री नागनाथ विद्यालय कुर्डू, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल बेंबळे,महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी, मंगल इंग्लिश स्कूल कुर्डुवाडी,नूतन इंग्लिश मिडीयम स्कूल कुर्डुवाडी , आदर्श पब्लिक स्कूल,श्री संत गजानन महाराज गुरुकुल रोपळे, डाॅ.नेताजी करळे विद्यालय, न्यू इंग्लिश मेडियम हायस्कूल ॲण्ड ज्यू काॅलेज आढेगाव या शाळांचा समावेश आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विद्यार्थ्यांनी मिळवले उत्तुंग यश
एकूण ४ हजार ९७९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४३८ विद्यार्थी विशेष श्रेणीत,प्रथम श्रेणीत १ हजार ६६७ विद्यार्थी ,द्वितीय श्रेणीत १२२० विद्यार्थी तर तृतिय श्रेणीत ३२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेला सोलापूर जिल्ह्यातून ६४ हजार४५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातील ६३ हजार ८४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यातील ५९ हजार २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ३४ हजार ७७३ विद्यार्थी परीक्षेला नोंदणी केले होते त्यातील ३४ हजार,४३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातील ३१ हजार ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०.४ टक्के इतके आहे. त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेला २९ हजार ६८१ मुलींनी नोंदणी केली होती. त्यातील २९, हजार ४१७ मुलींनी परीक्षा दिली आणि त्यातील २८ हजार २७२मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.१०टक्के इतके आहे. सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल चांगला लागला आहे यामध्ये पुन्हा मुलीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. शास्त्र शाखेमध्ये ९० टक्केच्या पुढे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.