
Koyna Dam
पाटण : तालुक्यातील विविध विभागांसह कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या शिवाजी सागर जलाशयात ३० हजार ६५ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू झाली असून, सध्या धरणात १९.०४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यावर्षी १३.५५ टीएमसी इतका कमी पाणीसाठा झाला होता. त्यानंतर हळूहळू पाण्याची आवक सुरू झाल्याने त्यात वाढ होऊ लागली आहे. सध्या घरणात १९.०४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरणाच्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीनंतर १ हजार ५० क्युसेक इतका सिंचनासाठी नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग रात्री उशिरा बंद करण्यात आला आहे. शिवाजी सागर जलाशयात सध्या हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा १९.०४ टीएमसी झाला आहे. पाणी उंची २०५३.०१ फूट, जलपातळी ६२५.७८० मीटर इतकी झाली आहे. मंगळवार (दि.५) सायंकाळी ५ ते बुधवारी (दि.६) सायंकाळी ५ पर्यंत कोयनानगर येथे १३८ मिलीमीटर (एकूण ७२४), नवजा २०६ (९३३) तर महाबळेश्वरला १७५ (८८५) मिलीमीटर पावसाची नोंद झाली.