
दहिवडी : “पाणी” फाउंडेशन मार्फत राबविल्या गेलेल्या फार्मर कप या स्पर्धेमध्ये पिंपरी ता. माण जि. सातारा येथील यशवंत शेतकरी गटाने एक लाख रुपयाचे बक्षीस पटकाविले. बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेसाठी राज्य भरातून ३४८ शेतकरी गट सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी काही अटी व नियम होते.
त्यामधे प्रामुख्याने सहभागी प्रत्येक शेतकरी गटाने शेतात उन्हामध्ये आडवी नांगरट करने, उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, चिकट सापळे, कामगंध व प्रकाश सापळे यांचा वापर त्याचप्रमाणे पिकाची खुरपणी, कापणी व मळणी आणि फवारणी करताना इर्जिक् पद्धत वापरणे या गोष्टींचं समावेश होता.तसेच रासायनिक किंवा पेस्टी साईड न वापरता विषमुक्त शेती करणे.
यशवंत शेतकरी गटामध्ये एकूण १९ सदस्य असून सर्वांनी एक जुटिने विषमुक्त शेती केली व एकूण १५.५० एकर क्षेत्रामध्ये ४८० क्विंटल एवढे विक्रमी मका उत्पादन घेतले. सहभागी शेतकऱ्यांमध्ये २० वर्ष पासून ६७ वर्ष वयोगट मधील लोकांचा सहभाग आहे.
सर्वांनी इर्जिकं पद्धतीने शेती केल्यामुळे शेतीच खर्च कमी झाला व उत्पन्न वाढले.
या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी पानी फाउंडेशनचे आमिर खान, किरण राव, डॉक्टर अविनाश पोळ, पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह, एबीपी माझाचे खांडेकर, टिना गुप्ता, जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, पुणे उपजिल्हाधिकरी सौ. सुरेखा माने, सातारा कृषी अधिक्षक सौ. भाग्यश्री फरांदे उपस्थित होते.
पानी फाउंडेशनचे समन्वयक भोसले, तालुका समन्वयक दयानंद निकम व ट्रेनर संकेत जाधव आणि आमची संपूर्ण टीम यामुळे आम्ही बक्षीस मिळवू शकलो,असे प्रतिपादन अध्यक्ष चंद्रकांत शिलवंत व सरपंच सौ.कोमल शिरीष राजगे यांनी केले.
फार्मर कप स्पर्धेसाठी पिंपरी ग्रामपंचायत मधील शेतकरी सरपंच सौ. कोमल शिरीष राजगे, तुळशीराम, राजगे बलभीम राजगे, श्रीरंग ढवळे, रामभाऊ राजगे, अण्णा सातपुते,किरण महानवर, संजय राजगे, नानासाहेब राजगे, शरद राजगे,नाना जाधव, आकाश राजगे,आकाराम राजगे,किरण माने,भारत सातपुते, धनाजी राजगे, सौ. उज्वला ढवळे,आबासो राजगे,यांनी सहभाग नोंदवून पिंपरी गावाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झळकविले.
याबद्दल आमदार जयकुमार गोरे, हरिभाऊ जगदाळे, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, बाळासाहेब रणपिसे, अंगराज कट्टे , बाळासाहेब खाडे, अशोक रणपिसे, दिगंबर राजगे, शहाजी अवघडे, भारत शिंदे, दीपक जाधव, सुरेश राजगे आदींनी अभिनंदन केले आहे.