
Shotgun Shooting Championship : राज्य शॉटगन नेमबाजीत समरजीत-अनिकाचा दबदबा; युवा आणि ज्युनियर गटांत सुवर्ण
महाराष्ट्र राज्य शॉटगन नेमबाजी स्पर्धेतील (Shotgun Shooting Championship) ट्रॅप प्रकारात समरजीत इंगळे आणि अनिका मुसळे यांनी प्रत्येकी दोन गटांत विजेतेपद पटकावले. बालेवाडी-म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील शॉटगन शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत यशवंत शिंदे आणि राजकुंवर इंगळे यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक मिळवले. मास्टर्स गटात मात्र सुवर्णपदकाचा निर्णय शूटऑफद्वारे झाला. त्यात रविंदरसिंह धामी याने बाजी मारली.
समरजीतने युवा आणि ज्युनियर पुरुष गटांत विजेतेपद मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. युवा गटात त्याने प्रतिस्पर्ध्यांवर 20 हून अधिक गुणांची आघाडी घेतली, तर ज्युनियर गटातही किमान 10 गुणांच्या फरकाने विजेतेपद मिळवले. महिला गटात अनिका मुसळेने युवा आणि ज्युनियर अशा दोन्ही गटांत सुवर्णपदक जिंकले. दोन्ही गटांत तिला स्मिता सावंतचे आव्हान होते. अनिकाने स्मितापेक्षा नऊ गुण अधिक मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.
IND Vs NZ: फक्त १०५ धावा अन् शुभमन गिल रचणार इतिहास! न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या विक्रमाची संधी
पुरुषांच्या मुख्य गटात यशवंत शिंदेने अखेरच्या फेऱ्यांमध्ये कामगिरी उंचावत अभिषेक पाटीलला तीन गुणांनी मागे टाकले. महिलांच्या मुख्य गटात राजकुंवर इंगळेने सुरुवातीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखत विजेतेपद मिळवले.
पाच फेऱ्यांच्या ट्रॅप प्रकारात सर्वच गटांत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मास्टर्स पुरुष गटातील तिन्ही पदकांचा निर्णय शूटऑफद्वारे झाला. प्राथमिक फेऱ्यांनंतर भूषण मुसळे आणि रविंदरसिंह धामी यांचे प्रत्येकी 102 गुण झाले होते. निर्णायक शूटऑफमध्ये रविंदरसिंहने 2-1 अशी बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. त्यापूर्वी झालेल्या ब्राँझ पदकाच्या लढतीत अभिजित देशमुखने कृष्णा दाभाडेवर 1-0 असा विजय मिळवला.
वय वर्षे 20, तिसराच वनडे अन् पाच विकेट्स! वैष्णवी शर्माची ICC Ranking मध्ये मोठी भरारी
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष अशोक पंडित आणि सचिव शीला कानुंगो यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर स्कीट प्रकारातील स्पर्धेला सुरुवात होईल.
पुरुष : 1) यशवंत शिंदे (सोलापूर) – 112, 2) अभिषेक पाटील (ठाणे) – 109, ३) पृथ्वीराज इंगळे (कोल्हापूर) – 108.
युवा पुरुष : 1) समरजीत इंगळे (कोल्हापूर) – 113, २) विहंग शिंदे (सातारा) – 88, ३) हरसिमरनसिंह धामी (सोलापूर) – 84.
ज्युनियर पुरुष : 1) समरजीत इंगळे (कोल्हापूर) – 113, 2) रणवीर शिंदे (सोलापूर) – 101, 3) विहंग शिंदे (सातारा) – 88.
मास्टर्स पुरुष : 1) रविंदरसिंह धामी (सोलापूर) – 102, 2) भूषण मुसळे (कोल्हापूर) – 102, 3) अभिजित देशमुख (नागपूर) – 93.
महिला : 1) राजकुंवर इंगळे (कोल्हापूर) – 110, 2) ऐश्वर्या आंदळकर पाटील (कोल्हापूर) – 102, 3) अलायना पॉल (पुणे) – 93.
युवा महिला : 1) अनिका मुसळे (सोलापूर) – 87, २) स्मिता सावंत (कोल्हापूर) – 78, ३) आर्या पाटील (कोल्हापूर) – 64.
ज्युनियर महिला : 1) अनिका मुसळे (सोलापूर) – 87, 2) स्मिता सावंत (कोल्हापूर) – 78, 3) जसकिरण कौर धामी (सोलापूर) – 71.
Ans: समरजीत इंगळेने युवा आणि ज्युनियर पुरुष गटांत, तर अनिका मुसळेने युवा आणि ज्युनियर महिला गटांत विजेतेपद पटकावले.
Ans: यशवंत शिंदेने 112 गुणांसह पुरुष गटात सुवर्णपदक जिंकले.
Ans: बालेवाडी-म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील शॉटगन शूटिंग रेंजवर ही स्पर्धा झाली.