Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळकरी मुलीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या, आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

या घटनेने घाबरलेल्या मुलीने शेवटी धाडसाने तिच्या आईला घटनेबाबत सर्व हकिकत सांगितली. पीडितेच्या आईने थेट गुहागर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात रितसर तक्रार दिली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 16, 2024 | 11:12 AM
शाळकरी मुलीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या, आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी
Follow Us
Close
Follow Us:

शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी अजित देवजी गोरीवले (वय सुमारे ४० वर्षे रा. उमराठ गोरीवलेवाडी, ता. गुहागर) यास चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी वीस वर्षे सक्तमजुरीची आणि 50 हजार रू. दंडाची शिक्षा आज सुनावली आहे.

आरोपी अजित देवजी गोरीवले याने 6 मे 2018 रोजी रात्री सुमारे 10 च्या सुमारास मुंबईवरून पाहुणी म्हणून गावी आलेल्या व स्वतःच्या मुलीप्रमाणे असलेल्या 15 वर्षाच्या शाळकरी मुलीला गोंधळाचा कार्यक्रम दाखविण्यासाठी घेऊन जाण्याचा बहाणा केला. त्यानंतर तिला मोटारसायकल वरून मौजे उमराठ येथील नवलाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस नेऊन बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने घाबरलेल्या मुलीने शेवटी धाडसाने तिच्या आईला घटनेबाबत सर्व हकिकत सांगितली. पीडितेच्या आईने थेट गुहागर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात रितसर तक्रार दिली.

या गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक समीर शेंडे यांनी करून तपासाअंती आरोपीविरूध्द भा.दं.वि.कलम ३७६, ३२३, ५०६ अन्वये तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाचे कलम ४, ६, ८, १० अन्वये चिपळूण येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश डॉ. नेवसे यांच्यापुढे पूर्ण झाली. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील ऍड अनुपमा ठाकूर यांनी ९ साक्षीदार तपासले. आरोपीने बचावासाठी १ साक्षीदार तपासला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी आज आरोपीस भारतीय दंड संहिता कलम ३७६(३), ३२३, ५०६ अन्वये तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ६ अन्वये दोषी ठरवून भा.द.वि कलम ३७६ (३) व पोक्सो ४ व ६ प्रमाणे आरोपी अजित देवजी गोरीवलेस २० वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा १ वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.

नुकसान भरपाईची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने केला. आरोपीला दिलेल्या शिक्षेमुळे महिला व शाळकरी मुलींवर वाढलेल्या लैंगिक अत्याचारासारख्या घटनांना आळा बसेल. तसेच या शिक्षेमुळे पीडितेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील ऍड ठाकूर यांनी व्यक्त केली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड ठाकूर यांनी काम पाहिले. त्यांना खटल्याच्या कामी कोर्ट पैरवी प्रदीप भंडारी यांनी सहकार्य केले.

Web Title: 20 years hard labor for the accused who raped a schoolgirl and threatened to kill her chipalun crime case ratnagiri crime case maharashtra police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • Ratnagiri Crime Case

संबंधित बातम्या

रत्नागिरी हादरली! कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने सख्या लहान भावाची केली हत्या; धारदार शस्त्राने सपासप वार
1

रत्नागिरी हादरली! कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने सख्या लहान भावाची केली हत्या; धारदार शस्त्राने सपासप वार

वर्क फ्रॉम होमच आमिष दाखवून टेलिग्रॅमवर 2.29 लाखांची फसवणूक; रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार
2

वर्क फ्रॉम होमच आमिष दाखवून टेलिग्रॅमवर 2.29 लाखांची फसवणूक; रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार

पैश्यांसाठी  पाच वर्षाच्या मुलाला आईने विकले; रत्नागिरीत जिल्ह्यातील प्रकार
3

पैश्यांसाठी पाच वर्षाच्या मुलाला आईने विकले; रत्नागिरीत जिल्ह्यातील प्रकार

पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला देशप्रेमींना दिला चोप;रत्नागिरीतील प्रकार
4

पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला देशप्रेमींना दिला चोप;रत्नागिरीतील प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.