यवतमाळ : जिल्ह्यातील घाटंजी व झरी जामणी (Ghatji and Zari Jamni) तालुक्यात काळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस (Rain with lightning) झाला. यामध्ये घाटंजी तालुक्यात पारवा येथे एका महिलेचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. तर झरी जामणी तालुक्यातील मांडवी येथे २१ शेळ्या – मेंढ्यांचा मृत्यू झाला.
हवामान विभागाने( Department of Meteorology) पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा (Heavy rain warning for five days) दिला आहे. दरम्यान काल यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाट असा पाऊस झाला. यात घाटंजी तालुक्यातील किन्ही शिवारात ( Kinhi Area ) सायंकाळी ६.०० च्या सुमारास वीज पडल्याने गिरिजा गंगाधर शेडमाके (३५) वर्षे ही महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचे समवेत इतर ५ व्यक्ती हे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींमध्ये बळीराम बाजीराव उचके, सविता दशरथ मेश्राम, नीता विलास पेंदोर, शारदा शंकर उचके, सोना सुरेश पराते आदींचा समावेश आहे. याशिवाय झरी जामणी तालुक्यातील मांडवी येथे गजानन गुंड्रावार, अनिकेत गहुकार, उस्मान पठाण, तनुबाई कुमरे, आनंदराव करपे यांच्या २१ शेळ्या मेंढ्याचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. स्थानिक तहसील व तलाठ्याकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.