महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?
महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ स्तरावर मोठी खांदेपालट झाली असून, राज्यभरातील एकूण २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही फेरबदल महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांतील पोलिस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये पोलिस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली आहे. तर विजय लगारे यांची मुंबई शहरात पोलिस उपआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय नागपूर, कोल्हापूर, लातूर, यवतमाळ, नाशिक, बुलढाणा, आणि संभाजीनगर यासारख्या ठिकाणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोणाची कुठे बदली?
विजय लगारे – पोलीस उपआयुक्त, मुंबई
गणेश इंगळे – पोलीस उपायुक्त, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
कृष्णात पिंगळे – अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
मंगेश चव्हाण – अपर पोलिस अधीक्षक, लातूर
अभिजीत धाराशिवकर – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर
पद्मजा चव्हाण – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, अहिल्यानगर
विजय कबाडे – पोलीस उपायुक्त, नागपूर (मुदतवाढ)
योगेश चव्हाण – उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
अशोक थोरात – अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळ
अमोल झेंडे – दक्षता अधिकारी, पुणे महानगर विकास प्राधिकरण
दीपक देवराज – पोलीस अधीक्षक, नागरी संरक्षण हक्क, ठाणे (मुदतवाढ)
सागर पाटील – सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुरक्षा विभाग, मुंबई
स्मिता पाटील – पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ, मुंबई
जयंत बजबळे – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे
सुनील लांजेवार – पोलीस उपआयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर
जयश्री गायकवाड – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर
रत्नाकर नवले – पोलीस उपआयुक्त, छत्रपती संभाजीनगर
प्रशांत बच्छाव – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक
नम्रता पाटील – पोलीस उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे
अमोल गायकवाड – अपर पोलिस अधीक्षक, बुलढाणा
पियुष जगताप – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, चंद्रपूर
बजरंग बनसोडे – पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर
ज्योती क्षीरसागर – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर
सोमनाथ वाघचौरे – अप्पर पोलिस अधीक्षक, श्रीरामपूर
ही फेरबदल स्थानिक आणि प्रशासकीय गरजांनुसार करण्यात आल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. बदल्यांमुळे स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत गती येईल असं प्रशासनाने म्हटलं आहे.