Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२३ वी श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा २०२४-२५; पुणे ग्रामीणचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत, उद्या रंगणार अंतिम थरार

बारामती येथील २३ व्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेत पुरूष विभागात पुणे ग्रामीण व महिलांमध्ये पुणे ग्रामीण उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 18, 2025 | 09:24 PM
२३ वी श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा २०२४-२५; पुणे ग्रामीणचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत, उद्या रंगणार अंतिम थरार

२३ वी श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा २०२४-२५; पुणे ग्रामीणचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत, उद्या रंगणार अंतिम थरार

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील २३ व्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धा रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या या कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात पुरूष विभागात बाद फेरीच्या झालेल्या पहिल्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने मुंबई उपनगर पूर्व संघावर ४०-२० असा दणदणीत विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे २३-८ अशी चांगली आघाडी होती. पुणे ग्रामीणच्या जीवन डोंबले,

अजित चौहान आणि स्वप्नील कोळीच्या चढायांनी विजय

स्वप्नील कोळी व अजित चौहान यांच्या चढायांच्या जोरावर हा विजय सोपा झाला. त्यांना अनुज गावडेने केलेल्या पकडींची चांगली साथ मिळाली. पुणे ग्रामीण संघाने सुरवातीपासुनच सामन्यावर आपली पकड घट्ट केली होती. त्यामुळे मुंबई उपनगर पूर्वच्या खेळाडूंना सावरण्यास संधीच मिळाली नाही. मुंबई उपनगर पूर्वच्या आकाश रुदले याने काहीसा प्रतिकार केला. तर शिवांश गुप्ता याने पकडी घेतल्या.

पुणे ग्रामीण अंतिम फेरीत

महिला विभागातील पहिल्या उपांत्य पूर्व फेरीच्या अटितटीच्या झालेल्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने पुणे शहर संघावर २८-२३ असा विजय मिळवित उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघ १०-१३ असा पिछाडीवर होता. मात्र पुणे ग्रामीणच्या अनुभवी प्रशिक्षक असलेल्या राजेश ढमढेरे यांच्या डावपेचांपुढे पुणे शहर संघाला पराभव पत्करावा लागला. पुणे ग्रामीण संघाच्या मंदिरा कोमकर चढाया व निकिता पडवळ हिने अष्टपैलू कामगिरी केली. त्यांनी अत्यंत सावध चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रेखा सावंत हिने उतत्कृष्ठ पकडी घेतल्या. पुणे शहर संघाच्या आम्रपाली गलांडे व अंकिता पिसाळ यांनी जोरदार प्रतिकार केला. मात्र त्यांना आपला पराभव टाळण्यात अपयश आले. सिध्दी मराठे हिने चांगल्या पकडी केल्या.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 19 जानेवारी रोजी 6 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार व् क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे,प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होईल. पारितोषिक वितरण समारंभही सांस्कृत्तिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून महाराष्ट्रातील प्रादेशिक नृत्ये व संगीत याची मेजवानी क्रीडा रसिकांना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच आयोजन समिती मार्फत रोख पारितोषिक रक्कमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून सदर स्पर्धेमध्ये खेळाडूंना रु.44.60 लक्षची प्रोत्साहनपर रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

 

Web Title: 23rd shri chhatrapati shivaji maharaj cup kabaddi tournament 2024 25 both teams from pune rural enter semi finals final thriller to be played tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 09:24 PM

Topics:  

  • baramati
  • Kabaddi Tournament 2024-25

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश
2

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त
3

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर
4

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.