Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…

अजित पवार यांचा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करत बारामतीकरांनी त्यांच्या या संशयित मृत्यूची सखोल व जलद गतीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 24, 2026 | 01:07 PM
अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता...

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता...

Follow Us
Follow Us:
  • अजितदादांचा अपघात नसून घातपातच
  • बारामतीकरांचा गंभीर आरोप
  • प्रांत कार्यालयासमोर आंदोलन
बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करत बारामतीकरांनी त्यांच्या या संशयित मृत्यूची सखोल व जलद गतीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच याबाबतचा पाठपुरावा करणारे आमदार रोहित पवार यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना, झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशीही मागणी बारामतीकरांच्या वतीने करण्यात आली आहे. बारामतीच्या प्रांत कार्यालयावर विविध पदाधिकाऱ्यांसह बारामतीकरांनी आंदोलन करून ही मागणी केली आहे.

 

याबाबतचे निवेदन बारामतीकरांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याच्या घटनेला येत्या २८ फेब्रुवारीला १ महिना पूर्ण होत आहे. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी ठरलेल्या अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघातामुळे जनतेच्या मनात तीव्र दुःख, अस्वस्थता आणि अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बारामतीकर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची कधीही न भरून येणारी हानी असून, या दुःखातून सावरणे सर्वांसाठी अतिशय कष्टाचे होऊन बसले आहे. महाराष्ट्राचे विकास पुरुष असणारे अजितदादा यांचे पुढील विकासाचे मोठे पाऊल टाकण्यापूर्वीच संशयास्पदरितीने विमान अपघातात अवेळी मृत्यु होणे ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी अविश्वसनिय असून, याची सखोल चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच सदर चौकशी प्राधान्याने फास्ट ट्रॅक पद्धतीने पूर्ण करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यात यावी, अशा घटना पुन्हा घडू नये, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या आंदोलनानंतर तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह महिला देखील मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात

आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

या अपघाताची किंवा घातपाताची सखोल चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि डीजीसीए यांच्याकडे आमदार रोहित पवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरील उच्च व्यक्तीचा अपघात किंवा घातपात होऊ शकतो याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणारे एकमेव आमदार रोहित पवार हे आहेत. ते या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत असून, ती लोकांपर्यंत पोहोचवत असल्यामुळे त्यांच्या जिवितासही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना, झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी बारामतीकरांच्या वतीने करण्यात आली.

Web Title: Citizens of baramati have demanded an investigation into deputy chief minister ajit pawars accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • baramati
  • CM Devedra Fadnavis
  • MLA Rohit Pawar

संबंधित बातम्या

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश
1

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
2

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान
3

Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ
4

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.