
गडचिरोलीत 23 गावांसाठी 259 कामे प्रस्तावित; 161 गावे जलपरिपूर्ण,
गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील १८४ गावांपैकी १६१ गाये जलपरिपूर्ण झाली. उर्वरित २३ गावांनाही जलपरिपूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. या २३ गार्वासाठी विशेष निधीतून २५९ कामांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यांची तांत्रिक मान्यताप्राप्त किंमत ६१४.५९ लाख रुपये आहे. प्रलंबित प्रस्तावांतील त्रुटी दूर करून कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुध्धारित आराखड्यातील ५,२७२ कामांपैकी ५.०१७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी ४७३८ कामे पूर्ण इशली असून, २९ कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित कामांचे प्रस्ताव तयार करताना केवळ बंधाऱ्यांची संख्या वाढविण्याऐवजी नाला खोलीकरण, वनतळे आणि योग्य ठिकाणी कंपोझिट गॅबियन बंधारे यामुळे प्रत्यक्षात किती पाणीसाठा निर्माण होईल, याचा विचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
मोठी बातमी ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा; परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी
जलयुक्त शिवाराच्या जिओ पोर्टलवरील नोंदींचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. मंजूर ५.०१७ कामांपैकी केवळ १,८७६ कामांचे जिओ-टॅगिंग पूर्ण झाले आहे. अहेरी तालुक्यातील ७७६ मंजूर कामांपैकी फक्त ५६ कामांचे जिओ टॅगिंग झाले असून त्याचे प्रमाण सुमारे सात टक्के आहे. प्रलंबित नोंदीची विभागनिहाय पडताळणी करून जिओ-टॅगिंगला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत २०२५-२६ मधील तलाव
खोलीकरणाच्या ५० कामांपैकी २९ कामे पूर्ण इझाली आहेत.
नऊ कामे प्रगतीपथावर असून १२ कामे अद्याप सुरू व्हायची आहेत, २०२६-२७ मधील नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या ४७ कामांपैकी ३७ कामे पूर्ण झाली आहेत. दीन कामे प्रगतीपथावर असून आठ कामांना सुरुवात व्हायची आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची १,१३१ कामे मंजूर असून त्यापैकी १.०५६ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर आत्तापर्यंत १७८४.८७ लाख रुपये खर्च झाला आहे. जलशक्ती अभियानाच्या ‘जल संचय जन भागीदारी-२०२६’ अंतर्गत नोंदवलेल्या ११ कामांपैकी सात कामे पूर्ण झाली असून, चार कामे प्रगतीपथावर आहेत.
जलसंधारणाची कामे ‘युक्तधारा’ पोर्टलवर
जलसंधारणाच्या कामांसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील पाच वर्षांचे नियोजन ग्रामसभेच्या मान्यतेसह ‘युक्तधारा’ पोर्टलवर डिसेंबरपर्यंत नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या. जुन्या पाझर तलावांतील गाळ काढणे, नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती, जलसाठ्यांच्या परिसरात बांबू लागवड तसेच जलसंरचनांच्या उपयोगितेचे सामाजिक लेखापरीक्षण यावरही बैठकीत चर्चा झाली.