Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारापूर एमआयाडीसीत भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू तर ११ पेक्षा अधिक जखमी, काही कामगारांची प्रकृती चिंताजनक

गामा ऍसिड उत्पादनाची रासायनिक प्रकिया सुरू असताना संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रिॲक्टरचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की लगतच्या सालवड गावात भूकंप झाल्याप्रमाणे कंप जाणवला. या अपघातामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर ११ पेक्षा अधिक कामगार भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 26, 2022 | 08:20 PM
तारापूर एमआयाडीसीत भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू तर ११ पेक्षा अधिक जखमी, काही कामगारांची प्रकृती चिंताजनक
Follow Us
Follow Us:

मुंबई – तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू असून ११ पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक डी- १७ मधील भगेरीया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत गामा एसिड उत्पादनाची रासायनिक प्रक्रिया सुरू असताना तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. गोपाल गुलजारीलाल सिशोदिया (३५), पंकज यादव (३२), सिकंदर (२७) अशी मृत कामगारांची नावे आहेत.

गामा ऍसिड उत्पादनाची रासायनिक प्रकिया सुरू असताना संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रिॲक्टरचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की लगतच्या सालवड गावात भूकंप झाल्याप्रमाणे कंप जाणवला. या अपघातामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर ११ पेक्षा अधिक कामगार भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना उपचारासाठी बोईसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात प्रभावित झालेले कामगार हे ठेका पद्धतीवर काम करणारे असल्याने त्यांची ओळख पटवण्याचे पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: 3 died more than 11 workers injured in terrible explosion in bhageria industries company of tarapur midc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2022 | 08:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • Tarapur MIDC

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.