संगीतसूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून चालवण्यात येणारे नाट्यगृह गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होते त्या ठिकाणी अतिक्रमणाच्या कारवाईतील साहित्य आणि महापालिका प्रशासनातील दप्तरांची रद्दी मोठ्या प्रमाणामध्ये टाकण्यात आलेली होती त्याशिवाय रंगमंच, खुर्च्या यांची दुरावस्था, वाढलेली झाडे झुडपे, तुटलेले दरवाजे याबाबत नवराष्ट्र ने वृत्त प्रसारित केले होते. त्याचा इम्पॅक्ट झाला असून विद्यमान महापौर धीरज सूर्यवंशी यांनी तातडीने या नाट्यगृहाला भेट देत त्या ठिकाणी ची पाहणी करून अधिकाऱ्यांना हे नाट्यगृह लवकरात लवकर स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज प्रत्यक्षपणे या नाट्यगृहाच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर हे नाट्यगृह पुनर्जीवित करणार असल्याचे आश्वासनही महापौरांनी दिले आहे.