कराड तालुक्यातील कांबिरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे 35 गुंठे ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे तब्बल 5 लाखांचे नुकसान (संग्रहित छायाचित्र)
कांबीरे-पाटील यांच्या शेतात आडसाली हंगामातील ८६०३२ जातीचा ऊस गळितास जाण्यास तयार होता. या ऊस क्षेत्रावरून महावितरणच्या वीजतारा गेल्या आहेत. या तारा अधिक लोंबकळत असल्याने एकमेकांना चिकटून शॉर्ट सर्किट झाले. अन् उसाला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ व युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग वेळीच नियंत्रणात आली. अन्यथा आजूबाजूचा २५ एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले असते.
संबंधित वीजतारा धोकादायक स्थितीत असल्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा कळवण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महावितरणने या घटनेची तातडीने पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा. योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जगन्नाथ पांडुरंग कांबीरे-पाटील यांनी केली आहे.
वारंवार घटना, तरी उपाययोजना नाही
एकाच शिवारात शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळण्याची पुनरावृत्ती झाली आहे. धोकादायक वीजतारांबाबत महावितरणकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना झाली नसल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने वीजतारांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
FAQ :
नेमके काय घडले? कुठे?
– कराड तालुका, कांबिरवाडी (सातारा जिल्हा) – शेतातून गेलेल्या MSEDCL च्या विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट ठिणगी पडून उभ्या ऊस पिकाने पेट घेतला. 35 गुंठे (जवळपास 0.88 एकर) ऊस जळून खाकहा काढणीस आलेला ऊस होता. हा ऊस 12-14 महिने वाढवलेला होता. मात्र, अचानक आग लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळण्याची ही पहिलीच घटना आहे का?
– नाही, महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसात हा 5 वा मोठा प्रकार आहे. 12 ऑक्टो – वाकडी, लातूर – 52 एकर – 22 शेतकऱ्यांचा ऊस – DP च्या शॉर्ट सर्किटने जळाला, अग्निशमन दलाने 4 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली होती.
या हंगामात ऊस दर काय? जळालेल्या ऊसाचे काय होते?
– जळालेला ऊस 24-48 तासात कारखान्यात नेला तर कारखाना घेतो, पण वजन 15-20% कमी, उतारा कमी, त्यामुळे कारखाना 200-400 रु / टन कमी दर देतो. काही कारखाने घेतच नाहीत.






