Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी 8300 बसेस; 3×2 बसेस सव्वा वर्षांनंतर येणार सेवेत

नव्या गाड्यांमध्ये साध्या, स्मार्ट, व्होल्वो (आसनी आणि शयनयान), मिनी बस अशा सर्वच श्रेणींच्या गाड्यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे साध्या बस ३ बाय २ आसनी असणार आहेत. एसटीकडे सध्या १४ हजार गाड्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 28, 2025 | 11:49 AM
एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी 8300 बसेस; 3×2 बसेस सव्वा वर्षांनंतर येणार सेवेत

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी 8300 बसेस; 3×2 बसेस सव्वा वर्षांनंतर येणार सेवेत

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : किफायतशीर आणि परवडणारा प्रवास म्हणून एसटी बसला प्राधान्य दिलं जातं. अनेक शासकीय योजनांमुळे एसटीतून सवलतीच्या दरात प्रवास करता येत आहे. असे असताना आता वाढत्या प्रवासी संख्येच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने दरवर्षी ताफ्यात 5 हजार नवीन बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबर 2026 अखेर आठ हजार ३०० नव्या गाड्यांची भर पडणार आहे.

नव्या गाड्यांमध्ये साध्या, स्मार्ट, व्होल्वो (आसनी आणि शयनयान), मिनी बस अशा सर्वच श्रेणींच्या गाड्यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे साध्या बस ३ बाय २ आसनी असणार आहेत. एसटीकडे सध्या १४ हजार गाड्या आहेत. त्यापैकी १२ हजार ५०० गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर धावत आहेत. तर उर्वरीत गाड्‌या नादुरुस्त असल्याने आगारात उभ्या आहेत. एसटीने दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी राज्यभर प्रवास करतात. या प्रवाशांसाठी धावत असलेल्या १२ हजार ५०० बसची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दरवर्षी महामंडळाच्या ताफ्यात ५ हजार नव्या बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेदेखील वाचा : संघापासून अजितदादा चार हात दूर? तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले, राजकीय भूमिकेची चर्चा

दरम्यान, ग्रामीण आणि तालुकास्तरासाठी तीन हजार साध्या बसच्या खरेदीची निविदा तयार केली आहे. साध्या बसमध्ये तीन बाय दोन आसनक्षमता असणार आहे. यामुळे आसनक्षमतेत वाढ होणार आहे, नव्या वर्षात या बसेसची चाचणी होईल, असे म्हटले जात आहे.

जिल्हा, तालुका मार्गावर नव्या स्मार्ट बसेस धावणार

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथून जिल्हे आणि तालुक्यांना जोडणाऱ्या मागाँवर स्मार्ट बस धावत्या करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. यासाठी पाच हजार बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यातील एक हजार बस येत्या वर्षभरात दाखल होतील. या बसमध्ये कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली कार्यान्वित असेल. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही आणि चालकांना झोप येत असल्यास त्याची माहिती देण्यासाठी अलार्म यंत्रणेची सुविधा या बसमध्ये असेल. सध्या याची निविदापूर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.

मेट्रो शहरांसाठी वॉल्वो

मुंबई-पुणे, गोवा, नाशिक-पुणे, कोकण अशा मार्गावरील पर्यटक आणि प्रवाशांसाठी वॉल्वो श्रेणीतील ५० स्लिपर आणि १५० आसनी बसगाड्या खरेदी करण्याचे नियोजन आहे.

Web Title: 8300 more buses to be added to st fleet 32 buses to come into service after one and a half years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Maharashtra State Road Transport Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.