Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावंतवाडीत मांडवी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग ‘द बर्निंग ट्रेन’ चा थरार; कोणतीही जिवीतहानी नाही

  • By Rahul Gupta
Updated On: Nov 01, 2023 | 04:42 PM
सावंतवाडीत मांडवी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग ‘द बर्निंग ट्रेन’ चा थरार; कोणतीही जिवीतहानी नाही
Follow Us
Close
Follow Us:

सावंतवाडी : सावंतवाडी (वा.) गोवा ते मुंबई दरम्यान कोकण रेल्वेच्या पाठीमागच्या एका डब्याखालून आग भडकल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सावंतवाडी स्थानकाच्या मागे अर्ध्या किलोमीटरवर हा प्रकार घडल्यानंतर लगेच रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थित कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे.सुदैवाने यात कुणीही जखमी नाही.

येथील कोकण रेल्वे स्थानकाहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ‘मांडवी एक्सप्रेस’ मधील प्रवाशांनी आज सकाळी अक्षरशः ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार अनुभवला. या मडगाव येथून मुंबईच्या दिशेने आज सकाळी निघालेली ‘मांडवी एक्सप्रेस’ मडुरे स्थानकावर पोहोचली. तोपर्यंत सर्वकाही ठिक होते. मात्र, या स्थानकावरून सावंतवाडीच्या दिशेने निघाल्यानंतर खळबळजनक घटना घडली. सावंतवाडी स्थानक अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असताना जनरेटर कार, दिव्यांग व गार्डसाठीच्या शेवटच्या डब्याच्या खालून आगच्या ज्वाळा भडकू लागल्या. यामुळे सावंतवाडी स्थानकावर कशीबशी गाडी आणून थांबवण्यात आली. या डब्यातील रेल्वे कर्मचार्‍यांनी स्थानकावरील अधिकार्‍यांना आगीबाबत माहिती दिली. डब्यातील महिला प्रवाशांनी घाबरून प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. त्यानंतर अग्निशमनासाठी वापरण्यात येणार्‍या बॉटल्स वापरून आगीवर नियंत्रण आणण्यात आले. उपस्थित कर्मचार्‍यांनाही आग लागण्याचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र, रेल्वेच्या डब्याला असलेल्या डिस्क ब्रेकमधील पॅड जळाल्याचा वास आल्याने ब्रेकमधील काही तांत्रिक कारणांमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमनच्या सहा बॉटल्स आतापर्यंत वापरण्यात आल्या. या घटनेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

Web Title: A coach of mandvi express caught fire in sawantwadi the thrill of the burning train no loss of life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2023 | 04:42 PM

Topics:  

  • Sawantwadi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.