
Dhurandhar 2 मधून मुस्लिमांची बदनामी आणि द्वेष पसरवण्याचा कट (Photo Credit- X)
अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भारतात आजवर अनेक दंगली आणि ऐतिहासिक घटना घडल्या आहेत, ज्यावर चित्रपट बनवता आले असते. मात्र, ‘धुरंधर 2’ची निर्मिती केवळ मुस्लिमांची बदनामी करण्यासाठी करण्यात आली आहे. “हा चित्रपट केवळ एक षडयंत्र आहे. ज्या प्रकारे यामध्ये मुस्लिम समुदायाचे चित्रण करण्यात आले आहे, त्यावरून स्पष्ट होते की, समाजात फूट पाडण्याचा हा सुनियोजित प्रयत्न आहे,” असा आरोप आझमी यांनी केला.
चित्रपटात माफिया डॉन अतीक अहमद याचे थेट संबंध पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ (ISI) शी दाखवण्यात आले आहेत. यावर आझमी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, “आमच्या पक्षाचे माजी खासदार आणि आयएसआय यांच्यात कोणताही संबंध असूच शकत नाही, असा प्रश्नच उद्भवत नाही. हे दावे करणारे लोक नेमके कोण आहेत? प्रत्येक धर्म, जात आणि समुदायात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. मात्र, ठराविक व्यक्तींना निवडून असे चित्रण करणे, म्हणजे केवळ मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवणे होय.” हा चित्रपट प्रगतीला चालना देण्यासाठी नव्हे, तर समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी बनवला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बंदी असूनही ‘Dhurandhar 2’ची पाकिस्तानात खळबळ; शेजारच्या देशात चित्रपटाचे पायरेटेड वर्जन स्ट्रीम
हा चित्रपट पूर्णतः खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगत आझमी यांनी आपला रोष व्यक्त केला. “जर हा पाकिस्तानी पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट असेल, तर तो पाकिस्तानमध्ये का दाखवला जात नाही? भारतात असे दाखवून काय साध्य करायचे आहे? देशात इतरही मोठे गुन्हे आणि गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर चित्रपट का बनत नाहीत? या चित्रपटाचा एकमेव उद्देश मुस्लिमांची प्रतिमा मलीन करणे हाच आहे. मी मानतो की, असे चित्रपट बनवणाऱ्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
मिडल ईस्टमध्ये (मध्य पूर्व आशिया) सुरू असलेल्या युद्धावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावरही आझमी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, हे युद्ध लवकरात लवकर संपले पाहिजे. “मिडल ईस्टमध्ये लाखो भारतीय काम करत आहेत. युद्धा मुळे सर्वत्र हाहाकार माजला असून गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. जर भारताच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबू शकत असेल, तर भारताने नक्कीच पुढाकार घ्यावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘Dhurandhar 3’ होणार रिलीज? ‘Dhurandhar 2′ रिलीज आधीच आदित्य धरची पोस्ट चर्चेत; चाहत्यांना दिली हिंट