
बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना बारामती तालुक्यातील मुढाळे या ठिकाणी घडली.
न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. ऑक्टोबर २०२१ रोजी पीडित मुलगी घरात अभ्यास करत असताना तिचा निर्दयी वडील त्या ठिकाणी येऊन विनयभंग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मात्र, हा प्रकार आईला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने मुलीला दिली. यांनतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पीडित मुलगी घरात झोपली असताना आरोपी वडीलाने तिचा विनयभंग केला. यावेळी पीडित मुलगी दुसऱ्या खोलीत निघून गेली.
याच दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी वडील दारु पिऊन आला. त्यावेळी त्याने तिला धमकी देऊन तिच्याशी अश्लिल कृत्य करून लैंगिक चाळे केले. या घटनेनंतर पीडित मुलगी सातारा जिल्ह्यातील साखरवाडी येथे तिच्या मामाकडे राहण्यासाठी गेली. यांनतर आरोपी ने पीडित मुलीच्या आईस दारु पिऊन मारहाण केली. यांनतर ४ फेब्रुवारी २०२२ रोजी पीडितेची आई साखरवाडी येथे भावाकडे आली. त्यावेळी पीडित मुलीने आई व मामास घडलेला प्रकार सांगितला.
यांनतर पीडितेला घेऊन बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात निर्दयी पित्याविरुद्ध फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याला मंगळवारी (दि.१२) अटक केली. दरम्यान, या घटनेने बारामती तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.