मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध सुरु केललं आंदोलन आज राज्यभरात पाहायला मिळत आहे. आज दादरमध्ये संदीप देशापांडे यांच्या नेतृत्वात भोंग्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेलं पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. ही धरपकड सुरू असतानाच संदीप देशपांडे एका गाडीत बसले. ते गाडीत बसल्याने पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेले असता या धावपळीत एक महिला पोलीस खाली पडल्या. महिला पोलीस पडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना उचललं.
[read_also content=”मनसेच्या अल्टिमेटमला न जुमानता उपराजधानीत झाली अजान, भोंग्याचा आवाज करण्यात आला होता कमी https://www.navarashtra.com/maharashtra/despite-mnss-ultimatum-ajan-was-heard-in-the-nagpur-nrps-275895.html”]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रक काढून भोंग्याविरुध्दच्या आंदोलनावर ठाम असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राज्यातील काही भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पण संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन दिसलं नाही. मुंंबईत अनेक ठिकाणी मशिंदीवर भोंगे न काढताच अजान करण्यात आली. तर, काही ठिकाणी अजान सुरु असताना मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात आल. दरम्यान, आतासंदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणी वाढण्याच्या दाट शक्यता आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे. मनसेच्या या दोन्ही नेत्यांना पोलीस ताब्यात घेत होते. त्यावेळी या दोघांनीही पोलिसांना गुंगारा दिला पळ काढला. मात्र, या दरम्यान एक महिला पोलीस जखमी झाली. त्यामुळे आता पोलिसांकडून ही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
[read_also content=”जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचा होणार कायापालट, राज्य शासनाकडून १४ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर https://www.navarashtra.com/maharashtra/14-crore-74-lakh-sanctioned-by-the-state-government-for-the-transformation-of-sports-complexes-in-the-district-nraa-275918.html”]