Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवपुत्र संभाजींचा इतिहास कसा दाखवता तेच पाहतो; फुकट्या पोलिसाची खासदार डॉ. अमोल कोल्हेंना धमकी

शिवपुत्र संभाजी (Shivputra Sambhaji) या महानाट्याच्या प्रयोगाचे मोफत पास दिले नाही म्हणून हा प्रयोग कसा होतो तेच पाहतो, अशी धमकी पिंपरी चिंचवडमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांना दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2023 | 07:37 AM
शिवपुत्र संभाजींचा इतिहास कसा दाखवता तेच पाहतो;  फुकट्या पोलिसाची खासदार डॉ. अमोल कोल्हेंना धमकी
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : शिवपुत्र संभाजी (Shivputra Sambhaji) या महानाट्याच्या प्रयोगाचे मोफत पास दिले नाही म्हणून हा प्रयोग कसा होतो तेच पाहतो, अशी धमकी पिंपरी चिंचवडमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांना दिली. यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांनी योग्य ती दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला समज द्यावी अशी मागणी डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट शिवपुत्र संभाजी महानात्याच्या रंगमंचावरूनच केली.

यावेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, यापूर्वी संभाजीनगर, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणी जेव्हा प्रयोग झाले त्यावेळी पोलिसांनी खूप मोठे सहकार्य केले. नाशिकमध्ये तर पोलीस आयुक्तांनी अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह तिकीट काढून हा प्रयोग दाखवला. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये आज अतिशय खेदजनक अनुभव आला आहे. शिवपुत्र संभाजी नाटकाच्या प्रयोगाची फुकट तिकीटे मिळाली नाही म्हणून हा प्रयोग कसा होतो हेच पाहतो अशी धमकी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.

अमोल कोल्हे म्हणाले की, माझा विरोध हा व्यक्तीला नसून अशाप्रकारे फ्री पास मागणाऱ्या प्रवृत्तीला आहे. सर्वसामान्य नागरिक जो कर भरतात त्यातून आपला पगार होतो, असे असताना छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी भीक मागता हे पोलिसांच्या उज्वल परंपरेला गालबोट लावणारे आहे.

26 /11 च्या वेळी तसेच कोविडच्या काळात पोलिसांनी प्राणांची परवा न करता कामगिरी बजावली या उज्वल परंपरेला शिल्लक स्वार्थापायी गालबोट लावणे योग्य नसल्याचे अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले. त्याचवेळी राज्याच्या गृहमंत्र्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना जर छत्रपती संभाजींचा इतिहास कसा सादर होतो हे बघतो असे म्हणत असेल तर त्याला योग्य ती समज द्यावी, अशी मागणीही डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी केली.

Web Title: A police man threaten to mp dr amol kolhe over shivputra sambhaji show nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2023 | 07:37 AM

Topics:  

  • marathi show
  • MP Dr Amol Kolhe

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील वातावरण पुन्हा तापलं, राखी- राकेशचं कडाक्याचं भांडण; नेमकं काय घडलं,पाहा Promo
1

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील वातावरण पुन्हा तापलं, राखी- राकेशचं कडाक्याचं भांडण; नेमकं काय घडलं,पाहा Promo

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.