नारायणगाव : नारायणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणालगत एका विषारी सापाला सर्प मैत्रिणीने जीवदान दिले. महाविद्यालयाच्या क्रीडांगणालगत एक विषारी घोणस साप येथील शिक्षकांना आढळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व विषारी साप असल्याचे लक्षात येताच येथील ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचे प्रा. विनय जाधव व चिराग भुजबळ तसेच क्रीडा संचालक ओंकार मेहेर यांनी रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे व तुषार कोराळे यांना याबाबत माहिती दिली.
वाजगे यांनी तात्काळ सर्पमैत्रीण नागेश्वरी केदार यांना संपर्क करून घोणस साप क्रीडांगणालगत असल्याची माहिती दिली. काही वेळातच नागेश्वरी केदार यांनी त्या विषारी घोणसला सिताफिने पकडून गणेश पिंगट यांच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. नागेश्वरी केदार यांनी आजपर्यंत बाराशे पेक्षा जास्त विषारी तसेच बिनविषारी सापांना मानवी वस्तीमधून पकडून जंगलात तसेच निसर्गाच्या सानिध्यात सोडून देऊन एक प्रकारे जीवदान दिले आहे.