Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईतील 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. महापालिका निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच अधिकृत भेट होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2026 | 01:06 PM
राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

Follow Us
Follow Us:

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू यांच्यात पुन्हा दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट आणि मुंबई महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीत मनसेला अपेक्षित वाटा ठाकरे गट देत नसल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. महापालिका निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच अधिकृत भेट होती. विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असतानाच या भेटीमुळे ठाकरे बंधूमधील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांबाबत मोठा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी या नावांची अधिकृत घोषणा होईल. मनसेने ठाकरे गटाकडे एक स्वीकृत नगरसेवकपद देण्याची मागणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तीनही जागा आपल्या कोट्यातून निश्चित केल्याने मनसेमध्ये नाराजी आहे.

संदीप देशपांडे यांच्याकडून अप्रत्यक्ष टीका

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या साऱ्या प्रकारावर अप्रत्यक्ष टीका केली. ‘कोत्या मनाच्या प्रवृत्तींकडून स्वीकृतीची अपेक्षा ठेवू नये,’ असा आशय त्यांनी व्यक्त केला. या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव उघड झाला आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संयमाची भूमिका घेतली. उद्धव आणि राज ठाकरे हे दोघेही पक्षप्रमुख असून, एका घरातील दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत. यावर आताच भाष्य करणे घाईचे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तणावाची निष्पत्ती काय?

महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे, आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित करणे, या सर्व घटनांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीत निर्माण झालेला हा तणाव पुढे कोणत्या टप्प्यावर जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेदेखील वाचा : सांगली महापालिका आयुक्तांचा प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाहनचालकाची थेट हकालपट्टी, मुकादमावर दंडात्मक कारवाई

Web Title: Rift between the thackeray brothers after raj thackeray meeting with dcm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • raj thackeray

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.