Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Accident: भरधाव टेम्पोची ट्रकला धडक; काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या

पघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी सर्वजण सिडकोमधील सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होते. हे सर्वजण  ते निफाड तालुक्यातील धारणगाव याठिकाणी देवकार्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 13, 2025 | 09:59 AM
Nashik Accident: भरधाव टेम्पोची ट्रकला धडक; काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक:  नाशिकमधून अंगाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली  आहे.  नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर झालेल्या अपघातामुळे संपूर्ण नाशिक जिल्हाच हादरून गेला आहे. द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा दुर्दैवी अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका उड्डाणपुलावर एक दुर्दैवी अपघात घडला, जिथे मुलांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोने एका आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून थेट मागच्या बाजूला शिरल्या आणि त्या जागीच मुलांच्या शरीरात घुसल्या.  याअपघतात सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी दोन मुलांचा उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Santosh Deshmukh Case: धनंजय देशमुखांचा आत्मदहनाचा इशारा; राज्य सरकार काय निर्णय घेणार?

लोखंडी सळ्यांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाणपुलावरून जात होता. परंतु ट्रकच्या मागील भागावर लाल दिवा, कापड, किंवा इतर कोणतेही इशारे देणारे चिन्ह नव्हते. त्यामुळे टेम्पोचालकाला ट्रकच्या मागील बाजूला लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे दिसले नाही. टेम्पो वेगाने धावत असल्यामुळे ट्रकला मागून जोरात धडक दिली. या धडकेमुळे ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या आत घुसल्या आणि मागच्या बाजूला बसलेल्या मुलांच्या शरीरात शिरल्या.

अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी सर्वजण सिडकोमधील सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होते. हे सर्वजण  ते निफाड तालुक्यातील धारणगाव याठिकाणी देवकार्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर महिला आणि पुरुष वेगवेगळ्या टेम्पोंमध्ये नाशिककडे निघाले असताना हा अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे.

निरोगी आरोग्यासाठी वयानुसार नियमित किती पाणी प्यावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

जर ट्रकच्या मागील बाजूस योग्य इशारा चिन्ह लावले गेले असते, तर हा अपघात टाळता आला असता. जोरदार धडकेमुळे घडलेल्या या  दुर्घटनेमुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये अजूनही दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले असे अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी व मालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी म्हटलं आहे.

सार्थक (लकी) सोनवणे, प्रेम मोरे, राहुल साबळे, विद्यानंद कांबळे, समीर गवई, अरमान खान, अनुज घरटे, साई काळे, मकरंद आहेर, कृष्णा भगत, शुभम डंगरे, अभिषेक आणि लोकेश अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे  आहेत. तर
अतुल संतोष मंडलिक (वय 22), संतोष मंडलिक (वय 56), यश खरात, दर्शन घरटे, चेतन पवार (वय 17) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर इतर दोन मृत व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत .

Web Title: A speeding tempo hit a truck breaking the glass and iron bars entering the bodies of the children nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • nashik accident news

संबंधित बातम्या

Nashik Accident: भीषण अपघात! वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू
1

Nashik Accident: भीषण अपघात! वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.