Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीवायसी एचडीएफसी रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एकूण 194 खेळाडू सहभागी; स्पर्धेस आजपासून प्रारंभ

  • By युवराज भगत
Updated On: Mar 05, 2024 | 08:21 PM
A total of 194 players participated in the PYC HDFC Racquet League 2024 tournament; The competition starts today

A total of 194 players participated in the PYC HDFC Racquet League 2024 tournament; The competition starts today

Follow Us
Follow Us:

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी  बँक रॅकेट लीग स्पर्धेस उद्यापासून ता. सहा पासून प्रारंभ होत असून या 6 संघात मिळून 194 खेळाडू सहभागी झाले आहेत. दहा तारखेपर्यंत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर दहा तारखेपर्यंत ही स्पर्धा होत आहे.

नाविन्यपूर्ण अशी लीग स्पर्धा मिश्र गटांत होणार

अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे आणि क्लबचे मानद सचिव सारंग लागू यांनी सांगितले की, पीवायसी एचडीएफसी रॅकेट लीग ही अनोखी व नाविन्यपूर्ण अशी लीग स्पर्धा मिश्र गटांत होणार असून यामध्ये प्रौढ, पुरूष, महिला आणि कुमार यांचा संघात समावेश असणार आहे.

चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात लीग स्पर्धा

क्लबचे मानद सचिव सारंग लागू पुढे म्हणाले की, क्लबच्या सभासदांकरिता क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, फिटनेस आणि इतर सर्व रॅकेट क्रीडा प्रकारांमध्ये अशा चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात लीग स्पर्धा आयोजित करणारा पीवायसी हिंदू जिमखाना  क्लब हा शहरांतील एकमेव क्लब आहे. तसेच या क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून सदस्यांना  मनोरंजनबरोबरच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्वपूर्ण ठरेल.  या प्रमुख स्पर्धेबरोबर सलग दुसऱ्या वर्षी 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी किड्स लीग स्पर्धा खेळविण्यात येणार असुन यामध्ये 40 खेळाडूंचा समावेश आहे.

सारंग लागु पुढे म्हणाले की, स्पर्धेला सलग दुसरी वर्षी एचडीएफसी बँक यांचे प्रायोजकत्व लाभले असून आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच, याशिवाय ही स्पर्धा सलग सात वर्षे आमच्या क्लबमध्ये यशस्वीरित्या पार पडत असल्यामुळे आम्हांला खुप आनंद होत आहे.

या लढतीमध्ये दोन्ही संघात मिळून बॅडमिंटन व टेबल टेनिस प्रकारात आठ सामने आणि टेनिस प्रकारात सात सामने असे एकूण 23 सामने होणार आहेत. तसेच, प्रत्येक क्रीडा प्रकारात खेळाडूला त्याच्या खेळातील क्षमतेनुसार स्टार देण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेत या तीनही क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार असल्याचे त्यांनी नमुद केले. या तीनही क्रीडा प्रकारात खुल्या दुहेरी गटाचे सामने प्रत्येकी 30 गुणांचे तर, याशिवाय टेनिस प्रकारात 6 व 7चे सामने प्रत्येकी 20गुणांचे असणार आहेत.

स्पर्धेसाठी 194 खेळाडूंची निवड लिलाव पध्दतीने करण्यात आली असून हे खेळाडू सहा

संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यामध्ये तेजस किंजवडेकर(4750,स्पिअर्स)सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्यानंतर या खेळाडूंमध्ये नील केळकर(4250, तलवार्स), संग्राम पाटील(4050,लॅन्सर्स), राहुल पाठक(4000,रॉकेट्स), आर्य देवधर(4000,कोल्टस) यांचा समावेश आहे.

स्पर्धेतील सहभागी संघ व संघमालक यामध्ये
रावेतकर मस्कीटर्स – अमोल रावेतकर, पराग चोपडा
अय्यर कोल्ट्स-अथर्व अय्यर व समीर जालन
पंडित जावडेकर तलवार्स-शिवकुमार जावडेकर
स्पिअर्स – अमोल जोग व आशुतोष आगाशे
रॉकेट्स – तुषार मेंगळे
लॅन्सर्स – आलोक तेलंग यांचा समावेश आहे.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अभिषेक ताम्हाणे, तुषार नगरकर, तन्मय आगाशे, सारंग लागु, रणजीत पांडे, दिप्ती सरदेसाई, केदार नाडगोंडे, नंदन डोंगरे यांचा समावेश आहे.

Web Title: A total of 194 players participated in pyc hdfc racquet league 2024 tournament the competition starts today nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2024 | 08:21 PM

Topics:  

  • PYC Hindu Gymkhana Club

संबंधित बातम्या

स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय
1

स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.