गोंदिया : तब्बल 120 विद्यार्थ्यांना एका ट्कमध्ये अक्षरश: कोंबण्यात आलं. यामुळे श्वास गुदमरल्यानं 120 मुलं बेशुद्ध झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील हा प्रकार असून विद्यार्थ्यांना एका ठिकाणी स्पर्धेसाठी नेण्यात येत होत. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास केल्याने शाळ प्रशासना विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
[read_also content=”हार्ट ऑफ स्टोन हॉलीवूड चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ व्हिडिओ रिलीज! https://www.navarashtra.com/movies/heart-of-stone-hollywood-movie-first-look-video-released-nrps-329463.html”]
गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील 120 विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी ट्रकमधून नेण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अक्षरश: कोंबणयात आले. एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झाले आहेत. या विद्यार्थ्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एका विद्यार्थिनीला गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.