Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

7 वर्षे परफ्यूम वापरला पण सुगंधाने एकही तरूणी जवळ आली नाही; तरूणाची कोर्टात धाव

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या एका ग्राहकाने कपंनीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तरूणाने कंपनीचा एक्स परफ्युम तब्बल 7 वर्षे वापरला, मात्र तरी देखील जाहीरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकही तरूणी त्याच्या जवळ आली नाही. यामुळे संतप्त तरूणाने कोर्टात धाव घेत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 06, 2024 | 03:55 PM
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीविरोधात तरूणाची कोर्टात धाव (फोटो सौजन्य - istock)

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीविरोधात तरूणाची कोर्टात धाव (फोटो सौजन्य - istock)

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक कंपनी त्यांच्या प्रोडक्टच्या मार्केटींगसाठी जाहीरात करत असते. काही कंपन्या या जाहीरातींना ग्राहकांच्या भावनांशी जोडतात. प्रत्येक ग्राहक जाहीरातीमध्ये दाखवण्यात आलेल्या चित्रानुसार त्या प्रोडक्टविषयी आपले मत तयार करतो. काही जाहीराती अत्यंत आकर्षित असतात. या जाहीराती पाहताच आरपल्याला ते प्रोडक्ट खरेदी करण्याची इच्छा होते. पण ही सर्व चित्रं केवळ जाहीरातींपुरतीच मर्यादीत असतात. जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरलेच असं नसतं. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या प्रोडक्ट्सची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी, अशा प्रकारच्या आकर्षित जाहिराती तयार करतात. पण यामुळे काहीवेळा ग्राहकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

हेदेखील वाचा- पुढील 5 वर्षांत AI देणार कॅन्सरबाबत माहिती! उद्योगपती आनंद महिंद्रांचा मोठा दावा

आता अशीच एक घटना आता समोर आली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या एका ग्राहकाने तब्बल 7 वर्षे कंपनीचा एक्स परफ्यूम वापरला. परंतु जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकही तरूणी या तरूणाच्या जवळ आली नाही. यामुळे संतप्त ग्राहकाने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली असून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या ग्राहकाने केली आहे. याबाबत उद्योगपती हर्ष गोयनका यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.

हेदेखील वाचा- ‘हे’ आहेत जगातील कर्जबाजारी देश! भारताचा देखील समावेश आहे का, जाणून घ्या

एक्स परफ्युमची जाहिरात सगळ्यांनाच परिचित आहे. जाहिरातीमध्ये दाखवलं जातं की जेव्हा एखादा तरूण हा परफ्युम वापरतो, तेव्हा अनेक तरूणी त्याच्या जवळ येतात. हीच जाहिरात पाहून वैभव बेदी या तरूणाने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीचा एक्स परफ्युम खरेदी केला. या तरूणाने हा परफ्युम तब्बल 7 वर्षे वापरला, मात्र तरी देखील एकही तरूणी त्याच्या जवळ आली नाही. जाहीरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात काहीही घडले नाही, यामुळे संतप्त तरूणाने कोर्टात धाव घेतली. या तरूणाने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत उद्योगपती हर्ष गोयनका यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.

Vaibhav Bedi sues HUL for cheating and causing mental suffering after using Axe products for over 7 years with no success in attracting women.

“Where is the Axe effect?” Vaibhav asks, even presenting his used products to court.

The most insane lawsuit ever? pic.twitter.com/QNqlMvDUmO

— Harsh Goenka (@hvgoenka) August 4, 2024

उद्योगपती हर्ष गोयनका यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, वैभव बेदी नावाच्या ग्राहकाने फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. तरूणाने 7 वर्षे कंपनीचा एक्स परफ्युम वापरला. मात्र तरीही त्याला जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे परिणाम दिसले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या तरूणाने कोर्टात धाव घेत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडविरोधात खटला दाखल केला आहे. त्याने वापरलेले सर्व प्रोडक्ट्स वैभवने कोर्टात सादर केले आहेत. तसेच त्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

उद्योगपती हर्ष गोयनका यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, खूप चांगली गोष्ट घडली, देवाचे आभार, कोणीतरी सुरुवात केली. मी गेल्या १० वर्षांपासून हा परफ्युम वापरत आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात कडक कारवाई केली पाहिजे.

Web Title: A young boy goes to court against a perfume company for false claiming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 03:55 PM

Topics:  

  • perfume

संबंधित बातम्या

Astro Tips :   राशीनुसार ‘असा’  निवडा Perfume ; ज्योतिषशास्त्रात सांगितली आहेत ‘ही’ खास वैशिष्ट्यं
1

Astro Tips : राशीनुसार ‘असा’ निवडा Perfume ; ज्योतिषशास्त्रात सांगितली आहेत ‘ही’ खास वैशिष्ट्यं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.