अभिजीत बिचुकले बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संपू्र्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असेल ते बारामतीकडे. लोकसभेत नणंद भावजय सामना रंगला होता, तर विधानसेत काका-पुतण्या असा सामना रंगणार आहे. अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाचे युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र पवार कुटुंबांच्या या लढाईत आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतली आहे. ते बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे बारामती यंदाच्या निवडणुकीत चुरसीची लढत पहायला मिळणार आहे.
हेही वाचा- Maharashtra Election 2024 : उमेदवारी जाहीर झाली पण एबी फॉर्म मिळालाच नाही; उमेदवाराला अश्रू अनावर
अभिजीत बिचुकले कायमच या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्यापासून ते राज्यात जास्त चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी राज्यातील काही मतदारसंघातून विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवली आहे. अभिजीत बिचुकलेंनी २०१९ मध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. कसबा पेठ मतदारसंघातून पोटनिवडणूक देखील लढवली होती. पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक देखील त्यांनी लढवली होती. तर २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेविरोधात लढवली होती.
अभिजीत बिचुकले निवडणुकीला सामोरे जात असले तरी अद्याप त्यांना समाधानकारक यश मिळालेलं नाही. तरीही निवडणुकीमध्ये सहभागी होणं. आरोप करणं आणि प्रचाराच्या माध्यमातून ते चांगलेच चर्चेत राहिले.
हेही वाचा-PM Narendra Modi : PM नरेंद्र मोदींनी मागितली जनतेची माफी; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
“मला निवडून दिलं तर मी २८७ आमदारांपुढे या साताऱ्याचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही, कारण मी कुणाच्या पाठीमागे फिरत नाही, माझी स्वतंत्र विचारसरणी आहे, स्वतंत्र एथिक्स आहेत, माझी स्वतंत्र संकल्पना, कल्पना आहे. तिकिटासाठी कोणत्याही पक्षाच्या मागे फिरत नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.
२००४, २००९, २०१४ आणि आता २०२४ ला पुन्हा निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि माझी लढत लोकांना बघायला मिळेल. महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार येईल याबाबत मला माहीत नाही. तुम्ही मतदारांना ज्याप्रमाणे एकदा उदयनराजेंचा साताऱ्यातून पराभव केला होता, त्याच पद्धतीने माझा विजय करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.