Santosh Deshmukh murder accused walmik Karad given VIP treatment in Beed Jail
बीड : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे धक्कादायक फोटो देखील समोर आले. या हत्येनंतर बीडसह संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर मुख्य आरोपी म्हणून आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावरुन वाल्मिक कराड हा सध्या जेलची हवा खात आहे. मात्र तुरुंगामध्येच वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक आल्याची माहिती समोर येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तो सध्या बीडच्या मध्यवर्ती कारावासामध्ये आहे. या प्रकरणामध्ये आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कराडकडून केला जात आहे. त्यासाठी त्याने न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. मात्र सीबीआय अंतर्गत सुरु असलेल्या तपासामध्ये वाल्मिक कराड विरोधात सबळ पुरावे शोधण्याचे सुरु आहे. यामध्ये आता वाल्मिक कराडची प्रकृती खालावली आहे. त्याला तुरुंगामध्येच पॅनिक अटॅक आला आहे. यानंतर त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. यापूर्वी देखील वाल्मिक कराडची प्रकृती खालावली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला दुपारच्या वेळी अस्वस्थ वाटू लागलं. त्याची प्रकृती अचानक बिघडली. कारागृहात गेल्यापासून कराडच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला पॅनिक अटॅक आल्याचे निदान करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचा रक्त नमुना अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कारागृहामध्ये झाली मारहाण?
बीड जिल्हा कारागृहात बबन गितेच्या समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैद्यांमध्ये मारामारी झाली. या घटनेत वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेलाही मारहाण करण्यात आल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले होते. मार्च महिन्यामध्ये ही मारहाण झाली होती. सुरुवातीला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, बीड तुरुंग प्रशासनाने हे वृत्त फेटाळले आहे. प्रशासनाच्या मते, तुरुंगातील टेलिफोन वापरण्यावरून दोन कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता, परंतु या वादात ना वाल्मिक कराडचा सहभाग होता, ना सुदर्शन घुलेचा. घटनेच्या वेळी हे दोघे घटनास्थळी नव्हते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.